[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
BCCI New Chief Selector : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. अजित आगकर निवड समितीच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. त्यातच आज त्याने दिल्लीच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या चेतन शर्मा यांच्या खांद्यावर आहे. लवकर नवीन अध्यक्ष मिळणार आहे, त्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. दोन दिवसांपासून या नावासाठी वीरेंद्र सेहवाग याच्या नावाची जोरजार चर्चा होती. मात्र एबीपी न्यूजशी बोलताना सेहवान या वृत्ताचे खंडन केलेय.
अजित आगरकर सर्वात आघाडीवर –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजित आगकर सर्वात आघाडीवर आहे. अद्याप याबाबत कोणतेही वृत्त आलेले नाही, पण आगरकर याची निवड जवळपास निश्चित मानली जातेय. अजित आगरकर याने आतापर्यंत 26 कसोटी, 191 वनडे आणि 4 टी 20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेय. त्याशिवाय 42 आयपीएलचे सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आज अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे अजित आगरकर याला गुडबाय म्हटलेय. त्यामुळे अजित आगरकर याच्या नावाची चर्चा आणखी वाढली आहे. 2021 मध्येही निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अजित आगरकर याच्या नावाची चर्चा होती. अजित आकरगर याने त्यावेळीही मुलाखत दिली होती, पण चेतन शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
अजित आगरकरचं करिअर…
45 वर्षीय अजित आगरकर हा रमाकांत आचरेकर यांचा शिष्य राहिला आहे. अजित आगरकर याने 26 कसोटी सामन्यात 59 विकेट घेतल्या आहेत. तर 191 एकदिवसीय सामन्यात 288 विकेट घेतल्या आहेत. त्यासइवाय 4 टी 20 सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत. 42 आयपीएल सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत. त्याशइवाय कसोटीमध्ये अजित आगरकर याने 571 धावा केल्या आहेत. 191 वनडेमध्ये 1269 धावा चोपल्या आहेत. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
बीसीसीआयने मागवले अर्ज –
निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी बीसीआयने अर्ज मागवले आहेत. 30 जून अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख आहे. एक जुलै रोजी नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित आगरकर याचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्याशिवाय दिलीप वेंगसकर आणि रवि शास्त्री यांच्या नावाचीही चर्चा आहे. जतिन परांजपे, अशोक मल्होत्रा आणि सुलक्षणा नायक यांच्यी सीएसी समिती मुंबईत मुलाखत घेणार आहे.
[ad_2]