When Ajinkya Rahane Sent Yashasvi Jaiswal Off The Field From Live Match ; अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला सामना सुरु असताना मैदानाबाहेर का काढले होते

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : यशस्वी जैस्वालची सध्याच्या घडीला भारतीय संघात निवड झाली आहे. या संघाचा उपकर्णधार आहे तो अजिंक्य रहाणे. पण यापूर्वी अजिंक्य आणि यशस्वी यांच्यामध्ये एक अशी गोष्ट घडली होती की, जी जास्त कोणाला माहिती नाही. सामना सुरु असताना अजिंक्यने एकदा यशस्वीला थेट मैदानाबाहेर काढले होते. ती गोष्ट आज पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

ही गोष्ट नेमकी कधी आणि कशी घडली होती, जाणून घ्या…
क्रिकेटच्या मैदानात कधी कधी आति आक्रमकपणा खेळाडूंसाठी चांगलाच घातक ठरतो. हा अति आक्रमकपणा यापूर्वी यशस्वी जैस्वालला चांगलाच भारी पडला होता. कारण सामना सुरु असताना अजिंक्यने त्याला थेट मैदानाबाहेर काढले होते. ही गोष्ट घडली होती ती २०२२ साली. जेव्हा बीसीसीआयची दुलीप ट्रॉफी सुरु होती. यावेळी सामना सुरु होता तो पश्चिम आणि दक्षिण विभागात. त्यावेळी पश्चिम विभागाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता. हा सामना सुरु असताना यशस्वी हा सारखा दक्षिण विभागाच्या रवी तेजावर स्लेजिंग करत होता. १-२ वेळा ही गोष्ट घडली असती तर ठीक होते. पण यशस्वी सारखाच रवी तेजावर स्लेजिंग करत होता. ही गोष्ट अजिंकच्या लक्षात आली. त्यानंतर अजिंक्यने सामना सुरु असताना यशस्वीला मैदानाबाहेर केल्याचे पाहायला मिळाले. कारण क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. यामध्ये काही वेळा खेळाडू आक्रमक होत असतात. पण जर खेळाला बट्टा लागत असेल तर ती गोष्ट योग्य नसल्याचे अजिंक्यला जाणवले आणि त्यानंतर त्याने यशस्वीला थेट मैदानाबाहेर काढले होते. एक कर्णधार म्हणून अजिंक्यने त्याची जबाबदारी पार पाडली होती. यावेळी अजिंक्य हा किती कडक शिस्तीची कर्णधार आहे, हे समोर आले होते. पण आपण असे का केले, या गोष्टीचा उहापोह यशस्वीने त्यानंतर केला.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

क्रिकेटच्या मैदानात कर्णधार कसा असावा, हे अजिंक्यने त्यावेळी दाखवून दिले होते. त्यामुळे अजिंक्यच्या नेतृत्वाचे त्यावेळी कौतुकही झाले होते.

[ad_2]

Related posts