स्कॉटलँडने केला मोठा उलटफेर, भारतात होणाऱ्या विश्वचषकात वेस्ट इंडिजला नो एन्ट्री

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 : दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या वेस्ट इंडिजचे यंदाच्या विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न अपुर्ण राहणार आहे. झिम्बाब्वे येथे सुरु असलेल्या क्वालिफायर स्पर्धेत मोठा उलटफेर झाला आहे. स्कॉटलँडने वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. या पराभवामुळे वेस्ट इंडिजला भारतात होणाऱ्या विश्वचषकात भाग घेता येणार नाही. पात्रता फेरीतच वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आलेय. 

सुपर सिक्स फेरीच्या सामन्यात स्कॉटलँड संघाने वेस्ट इंडिजला 7 गडी राखून पराभूत केले. यासह वेस्ट इंडीज 2023 वनडे विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पहिल्या 2 वनडे विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला आता भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होता येणार नाही. कारण, पात्रता फेरीतच वेस्ट इंडिजचे आव्हान संपुष्टात आले. 

हरारे स्पोर्ट्स क्लब  येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघाने 181 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 चेंडू राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 या दोन एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले आहे. एकेकाळी क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारा वेस्ट इंडिज संघ यंदा विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ  खेळताना दिसणार नाही. 



[ad_2]

Related posts