Global Warming Climate Change Rising The Temperature Report Says Increase In Family Domestic Violence In India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Domestic Violence:  गेल्या काही वर्षापासून ग्लोबल वार्मिंग (Global Warming) आणि क्लायमेट चेंज (Climate Change) यामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. यासोबत निसर्गाचं चक्रही बदललं आहे. हवामान बदल आणि वाढत्या तापमानामुळे कौटुंबिक हिंसेत (Domestic Violence) वाढ होत असल्याचं समोर येत असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. भारत आणि भारतीय उपखंडातील  देशांत  ग्लोबल वार्मिंगमुळे कौटुंबिक आणि लैंगिक हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचंही त्यामध्ये म्हटलं आहे. याचा अर्थ, ग्लोबल वॉर्मिंगचा माणसाच्या वैयक्तिक संबंधांवरही परिणाम होत आहे. यामुळे घरातील स्त्रियांविरूद्ध शारीरिक, मानसिक भावनिक हिंसा (IPV) वाढत आहे. यासंबंधित नुकतंच JAMA Psychiatry जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

कौटुंबिक हिंसेच्या घटनांत वाढ

भारत, नेपाळ आणि पाकिस्तान या देशातील 15 ते 49 वर्षापर्यंतच्या 1 लाख 94 हजारापेक्षा जास्त महिलांवर एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व माहिलांनी एक तक्रार केली आहे की, शारीरिक, भावनिक आणि लैगिंk हिंसेच्या घटना वाढल्या आहेत. ही सर्व आकडेवारी 1 ऑक्टोबर 2010 ते 30 एप्रिल 2018 यादरम्यानच्या काळातील अभ्यासावर आधारित आहे.  

महिलांविरूद्ध कौटुंबिक हिंसेच्या घटनात झाली आहे वाढ

हा सर्व अभ्यास चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंग्लड आणि टांझानिया येथील शास्त्रज्ञांनी एकत्रित मिळून केला आहे. या संशोधनात असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, जेव्हा शास्त्रज्ञांनी महामारीचं आणि उच्च तापमाना वाढीच कारण तपासलं तेव्हा असं आढळून आलं की वाढत्या तापमानासह महिलांवरही हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या बदलांकडे गांभिर्यानं पाहायची वेळ येऊन ठेपली आहे.

वाढत्या तापमानामुळे अजून हिंसेच्या घटनांत होईल वाढ

जेव्हा भविष्यात आणखीन तापमान वाढ होईल तेव्हा हिंसेच्या घटनेत वाढ होणार आहे. या अभ्यासातून शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की, जेव्हा वार्षिक तापमानात 1 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त वाढ होते तेव्हा भावनिक, शारीरिक, मानसिक हिंसेत 4.9 टक्के इतकी वाढ होते. यामध्ये सर्वाधिक 23 टक्के शारीरिक हिंसा, 12.5  टक्के भावनिक हिंसा आणि शारीरिक हिंसेमध्ये 9.5 टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे.  यावेळी सरासरी तापमान हे  20 डिग्री सेल्सियस ते 30 डिग्री सेल्सियस इतकं होतं. 

हिंसेचा प्रकार आणि आकडेवारी

या दशकाच्या अखेरपर्यंत कौटुंबिक हिंसेच्या दरात 21 टक्के वाढ  होण्याची शक्यता आहे. याचं कारण कार्बन उत्सर्जनमुळे तापमानात वाढ झाली आहे. याची झळ आपल्या सर्वांनाच सहन करावी लागत आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाही, तर महिलांसोबत हिंसेच्या घटनांत वाढत होत जाईल. या दशकाच्या अखेरपर्यंत शारीरिक हिंसेच्या घटनांमध्ये  28.3 टक्के वाढ, तर लैंगिक  हिंसेच्या घटनांमध्ये 26.1  टक्के  आणि  भावनिक हिंसेच्या घटनांमध्ये 8.9 टक्के इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात कौटुंबिक हिंसेचं प्रमाण सर्वाधिक आहे.  यामुळे  2090 पर्यंत कौटुंबिक हिंसेच्या प्रमाणात 23.5 टक्के इतकी वाढ होईल.  यानंतर नेपाळ 14.8 टक्के इतक्या दरानं दुसऱ्या क्रमांकावर राहिल. तर पाकिस्तानमध्ये सर्वात कमी 5.9 टक्के इतकी वाढ राहिल. हे विश्लेषण 2 जानेवारी 2022 पासून ते 11 जुलै  2022  पर्यंतच्या आकडेवारीवर आधारीत आहे. 

भारत, चीन आणि युरोप या  देशांत जाणवेल सर्वाधिक परिणाम

हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगचा सर्वाधिक परिणाम भारत, चीन, अमेरिका आणि युरोप या देशांत आढळून आला आहे. या देशातील अनेक शहरांमध्ये लोकांना उष्णतेच्या लाटेच्या समस्येला सामोरे जावं लागलं आहे. यामुळे IPV च्या  प्रमाणात 4.9 टक्के इतकी वाढ होण्याचा अर्थ आहे की, कौटुंबिक हिंसेच्या संख्येत  6.3 टक्के इतकी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शारीरिक आणि लैंगिक हिंसेचा समावेश आहे. 

वाचा महत्त्वाच्या बातम्या :

दहापैकी एका पतीने पत्नीच्या हातचा मार खाल्ला; शहराच्या तुलनेत गावातील पती जास्त मार खातात

[ad_2]

Related posts