Traffic Problem On Mumbai Nashik Highway Due To Weekend And Poor Road Condition Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai -Nashik Highway:  सध्या सुरु असलेल्या पावसामुळे आणि आलेल्या विकेंडमुळे प्रवाशांची फिरायाला जाण्याची लगबग सुरु आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई – नाशिक (Mumbai -Nashik Highway ) महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. मुंबई नाशिक महामर्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. शहापूर तालुक्यातील वासिंद परिसरात ही वाहतूक कोंडी झाली होती. परंतु तब्बल पाच तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.  या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या जवळपास दोन ते तीन किमी लांब रांगा लागल्या होत्या.

मागील तीन ते चार तासापासून सुरु असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने अडकली होती. तर यामुळे प्रवशांना देखील त्रास होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या. वासिंद येथे सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं म्हटलं जात आहे. तर नागरिकांना पर्यायी रस्ता देखील उपलब्ध नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे. 

ठाणे शहरातही मोठी वाहतूक कोंडी 

ठाणे शहरात दररोज वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळते. आज शनिवार (1 जुलै) रोजी  दुपारी मोठ्या प्रमाणात  ठाणे शहरात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. ही वाहतूक कोंडी ठाण्याच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर झाली होती. यामध्ये मुंबई- नाशिक महामार्ग ते भिवंडी-बायपास महामार्गवर शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या चाकारमान्यांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. 

चाकरमान्यांना ठाण्यातील कळवा-खारेगाव टोल नाक्यापासून ते भिवंडी बायपासपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास झाला. मुंबई नाशिक महामार्गावरील युद्ध पातळीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामकाजांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच त्रास नागरिकांना देखील झाला. तर या वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याची मागणी यावेळी नागरिकांना केली आहे. 

सध्या सुरु असलेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासापासून नागरिकांचा सुटका कधी होणार हा देखील सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच रस्त्यांवर सुरु असलेल्या कामांमुळे आणि खड्ड्यांच्या साम्रांज्यांमुळे नागरिक हैराण झाल्याचं देखील म्हटलं जात आहे. राज्यात सध्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. 

हे ही वाचा :

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शोधलं, 3 महिन्याचे संशोधन

[ad_2]

Related posts