Buldhana Accident Pravin Vankar Family Diet In Samrudhi Mahamarga Accident

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात पिंपरी चिंचवड परिसरातील वनकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. कुटुंबातील सर्वच महिलांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये व्यवसायाने संगणक अभियंते असलेले प्रवीण वणकर यांच्या  दोन वर्षाच्या चिमुकलीसह, पत्नी आणि आई असा तिघीचांही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरातील सगळ्याच महिला गेल्याने शोक व्यक्त केलं जात आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात असलेल्या जरवरी सोसायटीमध्ये हे कुटुंब राहत होत. एका लग्न समारंभसाठी दोन दिवसांपूर्वी  हे कुटुंब विदर्भातील त्यांच्या गावी गेले होते. काल परत येत असताना हा अपघात झाला आणि त्यामध्ये तिघिंचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेवक नाना काटे यांनी दिली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून सर्व पिंपरी चिंचवडकर वनकर कुटुंबासाठी हळहळ व्यक्त करत आहेत. 

Buldhana Accident : अपघाताच्या चौकशीचे आदेश – 

अपघाताची माहिती मिळताच पिंपळखुटा येथील नागरिक मदतीसाठी पोहोचले. दोन वाजताच्या आसपास अग्निशामन दलाच्या गाड्याही पोहचल्या. पोलिसही घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी जळालेल्या बसमधून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत 25 मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर आठ वाजता फॉरेन्सिक टीमने घटना स्थळाचा आढावा घेतला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Buldhana Accident : कसा झाला अपघात?

बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसनं पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्यानं बसनं वेगानं पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.

[ad_2]

Related posts