Sushma Andhare VS Neelam Gorhe Apologize In Writing Within Eight Days Warn Motion Of Privilege Hakka Bhang Prastav Vidhan Parishad Speaker After BJP Pravin Darekar Slams

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर :  उपसभापती रविंद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar)   सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळं तात्काळ सुषमा अंधारे यांच्यवर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केले आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल, असे नीलम गोऱ्हे म्हणाले. 

रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत तर मग विधानपरिषदेच्या उपसभापती  नीलम गोऱ्हे त्यांना बोलू कशा देत नाहीत? असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर सुषमा अंधारेच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,  धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन.  

नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप करत व्हिडिओ व्हायरल केला होता. दरम्यान यावरूनच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नसल्याचे मत मांडले. तसेच, माहिती न घेता आरोप करणे चुकीचे असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. विशेष म्हणजे यावर अनेक आमदारांनी देखील आपली भूमिका सभागृहात मांडली. 

सभागृहात कोण काय म्हणाले?

शशिकांत शिंदे:  सभागृहाबाहेर बोलल्याचा संबंध सभागृहाशी नाही.अशा प्रकारे हक्कभंग मांडणे, हा नियम बनू शकतो

सुधीर मुनगंटीवार: याविषयी काही नियम बनविण्याची गरज आहे.याकरता समिती बनविण्याची गरज आहे

सचिन अहिर:  मी मान्य करतो की त्यांचे बोलणे चुकीचे आहे. 

 

 

हे ही वाचा :

Sushma Andhare : ललित पाटील प्रकरणी देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत आहेत, नीलम गोऱ्हे पक्षपातीपणा करतात; सुषमा अंधारे यांची टीका 

[ad_2]

Related posts