Sunil Gavaskar Gave India The Success Mantra To Win ODI World Cup 2023 ; गावस्करांनी दिला भारताला World Cup जिंकण्याचा मंत्र

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : क्रिकेट विश्वात सध्याच्या घडीला ODI World Cup ची जोरदार चर्चा सुरु आहे. भारताला हा विश्वचषक जिंकायचा असेल तर काय करावे लागेल, याचा गुरुमंत्र आता भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी दिला आहे. यावेळी भारतासाठी पहिलाच सामना कसा गेमचेंजर ठरेल, याबाबतही गावस्कर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

गावस्कर यांनी सांगितले की, ” भारतीय संघ या विश्वचषकात नऊ सामने खेळणार आहे. पण भारतासाठी यावेळी पहिलाच सामना महत्वाचा असेल. कारण पहिला सामना हा भारतासाठी गेमचेंजर ठरू शकतो. भारताचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. ऑस्ट्रेलिया हा क्रिकेट विश्वातील एक बलाढ्य संघ आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाबरोबर जर त्यांचा पहिलाच सामना झाला तर भारतीय संघासाठी ते हितकारक असेल. कारण या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला आपले नेमके काय आणि कुठे चुकते हे समजू शकते. त्याचबरोबर भारताला यावेळी आपल्या कच्च्या दुव्यांवर अधिक मेहनत घेता येऊ शकते. या पहिल्या सामन्यातील काही गोष्टींचा फायदा हा भारताला पुढच्या लढतींसाठी नक्कीच होऊ शकतो. जर ऑस्ट्रेलियासारखा संघ जर भराताबरोबर अखेरचा सामना खेळणार असेल, तर ते त्यांच्यासाठी थोडे धोकादायक ठरू शकते. कारण साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक संघाला बाद फेरीत जायचे असते. त्यामुळे त्यावेळी काही समीकरणं समोर येऊ शकतात. त्यावेळी ऑस्ट्रेलियासारखा संघ जर समोर असेल तर काही गोष्टी कठीण होऊ शकतात. त्यामुळे भारताचा पहिलाच सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे, हे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे.या सामन्यानंतर भारताला एक रिअॅलिटी चेक मिळेल आणि त्याचा फायदा त्यांना पुढच्या सामन्यांसाठी नक्कीच होऊ शकतो.”

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारताचा पहिलाच सामना हा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यानंतर भारतासाठी सर्वात महत्वाचा सामना असेल तो पाकिस्तानशी. हा सामना १५ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यानंतर भारताला आपले कच्चे दुवे समजले तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना पाकिस्तानच्या मॅचमध्ये होऊ शकतो.

[ad_2]

Related posts