[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
श्रीलंकेचा आज विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील सामना हा झिम्बाब्वेबरोबर झाला होता. या सामन्यात झिम्बाब्वेची प्रथम फलंदाजी होती. त्यावेळी झिम्बाब्वेला १६५ धावाच करता आल्या होत्या. श्रीलंकेच्या महीश तिकक्षनाने यावेळी चार विकेट्स घेतले होते, तर पथीरानाने दोन विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला पथुम निसांकाने धडाकेबाज सुरुवात करून दिली, त्याने यावेळी शतक झळकावले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पथुमने यावेळी १४ चौकारांच्या जोरावर नाबाद १०३ धावांची खेळी साकारली. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाने यावेळी ९ विकेट्स राखून मोठा विजय साकारला. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने आता भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये प्रवेश केला आहे.
या विश्वचषकात भारताचे एकूण ९ सामने खेळवण्यात येणार आहे. यामध्ये श्रीलंकेचाही समावेश आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना आता मुंबईत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना २ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या मैदानातच भारत आणि श्रीलंका यांच्यातील २०११ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी झाली होती.
वेस्ट इंडिजला मात्र या विश्वचषकासाठी पात्र ठरता आले नाही. कारण त्यांना विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागला. स्कॉटलंडच्या या सामन्यात वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी होती. या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांचा अर्धा संघ फक्त ६० धावांत गारद झाला होता. पण त्यानंतर जेसन होल्डरने ४५ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच त्यांना १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. पण त्यानंतर स्कॉटलंडने मात्र साह विकेट्स राखत हा सामना सहजपणे जिंकला आणि त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ हा भारतातील विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तब्बल दोन विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजवर ही पहिल्यांदाच नामुष्की ओढवली आहे.
[ad_2]