Motorola Razr 40 Series To Be Launched Today Motorola Razr 40 And 40 Ultra Features Specs Price Availability

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Motorola Razr 40 Ultra : मोटोरोला (Motorola) कंपनी आज भारतात नवीन स्मार्टफोन सीरीज लाँच करणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता भारतात Motorola Razr 40 Series लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये Motorola Razr 40 आणि 40 Ultra हे दोन नवे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. हे जगातील सर्वात स्लिम फ्लिप फोन असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.  Motorola Razr 40 Series मधील दोन्ही स्मार्टफोन तुम्हाला ॲमेझॉन (Amazon) वरून खरेदी करता येतील. या दोन्ही स्मार्टफोनबाबतचे खास फिचर्स, स्पेक्स आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Motorola Razr 40

या स्मार्टफोनमध्ये कंपनी Snapdragon 7 Gen 1 SoC, 8 GB रॅम, 256GB स्टोरेज, 6.9-इंच इनर FHD+ AMOLED डिस्प्ले आणि 1.9-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड सेन्सर उपलब्ध असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. Motorola Razr 40 स्मार्ट फोनची किंमत 59,999 रुपयांपासून सुरू होईल.

Watch Live : स्मार्टफोन लाँच इव्हेंट लाईव्ह पाहा…

Motorola Razr 40 Ultra

या स्मार्टफोनमध्ये 144hz च्या रीफ्रेश रेटसह 3.6-इंचाचा OLED कव्हर डिस्प्ले, 165hz च्या रीफ्रेश दरासह 6.9-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट आणि 3800 mAh बॅटरी असेल. तसेच 30W फास्ट चार्जिंग असेल. स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये 12MP मेन कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड सेन्सर असेल. त्यासोबतच 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. Motorola Razr 40 Ultra फोनची किंमत सुमारे 80,000 रुपये असू शकते. मोटोरोला अल्ट्रा मॉडेलची किंमत अद्याप उघड झालेली नाही.

‘या’ रंगात उपलब्ध

तुम्ही मोटोरोलाचे बेस मॉडेल ग्रे, चेरी पावडर आणि ब्राइट मून व्हाइट कलरमध्ये खरेदी करू शकाल. तसेच Motorola Razr 40 Ultra मॉडेल तुम्हाला Fengya Black, Ice Crystal Blue आणि Magenta रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

‘हा’ स्मार्टफोन उद्या लाँच होणार

उद्या 4 जुलै रोजी, IQ कंपनी भारतात आपली स्वतंत्र गेमिंग चिप IQOO Neo 7 Pro 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी, Snapdragon 8+ Gen 1, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि लेदर फिनिश बॅक मिळेल. IQOO Neo 7 Pro फोनची किंमत 33,999 रुपयांपासून सुरू होईल.

संबंधित इतर बातम्या :

[ad_2]

Related posts