NIA Raids In Three States,पाकिस्तानातून चालवले जाणारे ‘गझवा-ए-हिंद’ मॉड्यूलचा पर्दाफाश; NIAचे या ३ राज्यांत छापे – nia raids in three states in case related to organization ghazwa-e-hind

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : पाकिस्तानातील मूलतत्त्ववादी व्यक्ती चालवत असलेल्या ‘गझवा-ए-हिंद’ या संघटनेशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तीन राज्यांत विविध ठिकाणे रविवारी छापे घातले.

‘एनआयए’च्या या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांनी माहिती दिली. गेल्या वर्षी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘एनआयए’ने रविवारी या प्रकरणात पाच ठिकाणी छापे घातले. यामध्ये बिहारमधील पाटण्यातील दोन ठिकाणी; तसेच दरभंगा येथे एका ठिकाणी, गुजरातमधील सुरत आणि उत्तर प्रदेशातील बरेली येथे प्रत्येकी एका ठिकाणी छापे घालण्यात आले. या छाप्यांमध्ये मोबाइल फोन, मेमरी कार्ड, सिम कार्ड आणि काही कागदपत्रे संशयितांकडून जप्त करण्यात आली आहेत.

काय आहे प्रकरण?

पाटण्यातील फुलवारी शरीफ येथे गेल्या वर्षी १४ जुलैला मर्गहूब अहमद दानिश उर्फ ‘ताहिर’ याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी ‘एनआयए’कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. दानिश याच्याविरोधात भारतीय दंड संहिता आणि बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार सहा जानेवारीला आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पाकिस्तानातील सूत्रधार चालवित असलेले गझवा-ए-हिंद मोड्यूल भारतातील तरुणांना चिथावणी देत होते. आरोपी या मोड्यूलचा सदस्य होता.

काय आहे आरोप?

‘पाकिस्तानी नागरिक झैन याने ‘गझवा-ए-हिंद’ हा व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला होता. दानिश या ग्रुपचा ॲडमिन होता. या ग्रुपमध्ये त्याने अनेक भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी आणि येमिनी नागरिकांना सामील केले होते. दहशतवादी कृत्ये करण्यासाठी देशाल स्लीपर सेल करण्याचा हेतू हा ग्रुप सुरू करण्यामागे होता,’ असे तपास संस्थेने म्हटले आहे.
इमरान खान संकटात आता नवाझ शरीफ यांच्यासाठी गुड न्यूज; पुढच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट
सोशल मीडियाचा वापर

आरोपी दानिश याने व्हॉट्सॲप, टेलेग्राम आणि बीआयपी मेसेंजरसारख्या वेगवेगळ्या सोशल मीडिया मंचांचा वापर केला होता. त्याने सुरू केलेल्या ग्रुपमध्ये बांगलादेशी नागरिकांनाही सामील करून घेतले होते. अधिक तपास केला असता या प्रकरणात पाकिस्तानातील सूत्रधारांचा सहभाग असल्याचे समोर आले. गझवा-ए-हिंदच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचा या सूत्रधारांचा हेतू होता, असे ‘एनआयए’ने म्हटले आहे.

[ad_2]

Related posts