[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बीसीसीआयने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अजित आगरकर आता भारताच्या निवड समितीचा अध्यक्ष असेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. यापूर्वी आशीष शेलार हे बीसीसीआयमध्ये कोषाध्यक्ष या पदावर आहेत. त्यानंतर आता अजित बीसीसीआयमध्ये जाणारा दुसरा मराठमोळा व्यक्ती ठरला आहे. कारण आता भारतीय संघ निवडण्याची जबबादारी त्याच्यावर असणार आहे. अजित आगकरने बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे, त्यामुळे त्याला क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. त्याचबरोबर अजित आगरकरची स्वत: ची एक भूमिका कायम राहीलेली आहे. यापूर्वी एक समालोचक म्हणूनही त्याने काम केले असल्यामुळे त्याने सध्याचे क्रिकेट जवळून पाहिले आहे. यापूर्वी निवड समिती अध्यक्षाला स्वत:ची भूमिका नसल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे अजितची निवड करत बीसीसीआय एक सकारात्मक संदेश सर्वांना या माध्यनातून देऊ शकते. त्यामुळे अजित आगरकर यांची निवड समितीमध्ये वर्णी लागू शकते, असे म्हटले जात होते आणि तेच आता पाहायला मिळाले आहे.
अजित आगरकरने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी तर केलीच आहे. पण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही तो क्रिकेटमध्ये सक्रीय राहीला. अजित हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहायय्क प्रशिक्षक पदावर कार्यरत होता. त्यामुळे अजितला प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजितने काही वर्षांपूर्वी मुंबईच्या निवड समितीचा अध्यक्ष होता. त्यामुळे तो भारताच्या निवड समितीचे अध्यक्षपदी सांभाळू शकतो, असे म्हटले जात होते आणि हीच गोष्ट आता समोर आली आहे. त्यामुळे भारतीय संघ निवडण्याची जबाबदारी आता अजितवर असेल.
गेल्या काही दिवसांपासून अजितच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. पण बीसीसीआयने आज अखेर एक ट्विट केले आणि त्यांनी याबा़बतची माहिती सर्वांना दिली आहे. एक ट्विट करत त्यांनी ही माहिती प्रसारित केली आहे.
[ad_2]