बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तिने पूर्ण गावाला वेठीस धरले, प्रेयसीचा कारनामा ऐकून गावकरी हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Girl Cut Electricity Of Entire Village: प्रियकराला भेटण्यासाठी एका तरुणीने पूर्ण गावाला वेठीस धरले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी बोलावत असे मात्र दोघांना कोणी पाहिल अशी भिती सतत तिच्या मनात होती. त्यामुळं तिने एक कट रचला त्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांना नाहक मनस्ताप झेलावा लागला. प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी संपूर्ण गावाची वीज कापायची. त्यामुळं उन्हाळ्यात गावकरी गरमीने हैराण व्हायचे. 

पाऊस सुरू होण्याच्या आधी बिहार राज्यातील बेतिया गावात उन्हाळ्या झळांनी गावकरी त्रस्त झाले होते. त्यात भरीस भर म्हणजे दररोज रात्री गावातील वीज जायची. त्यामुळं गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागायचा. रोज रात्री लाइट का जाते याचे कारण शोधायला गावातीलच काही तरुण पुढे आले. तेव्हा गावातीलच एक तरुणी लाइट बंद करायची असे समोर आले. प्रियकराला भेटण्यासाठी तरुणी वीज कापायची. या घटनेनंतर गावकऱ्यांनी एका रात्री दोघांनाही रंगेहात पकडले आहे.

प्रेयसीचे नाव प्रिती असून प्रियकराला भेटण्यासाठी ती पूर्ण गावाची बत्ती गुल करायची. वारंवार लाइट जाण्याच्या या घटनेमुळं गावकरी त्रस्त झाले होते. गावकऱ्यांना जेव्हा या घटनेचे कारण समजले तेव्हा त्यांनी दोघांवर पाळत ठेवली. प्रितीला भेटायला तिचा प्रियकर आल्यानंतर तिने गावाची बत्ती गुल केली. मात्र आधीच त्यांच्या मागावर असलेल्या लोकांनी दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. त्यानंतर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. 

प्रितीच्या प्रियकराचे नाव राजकुमार असून तो बाजूच्याच गावचा रहिवासी आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या  प्रकरणाची चर्चा रंगल्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी दोघांच्या संमतीने त्यांचे लग्न लावून दिले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकरी संजय कुमार यांनी दोघांनाही त्यांच्या घरासमोरील बागेत नकोत्या अवस्थेत पाहिले होते. त्यावरुन त्यांनी दोघांनाही हटकले. याचाच दोघांनाही राग आला आणि त्यांनी संजय कुमार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून गावातील लोक जमा झाले आणि् त्यांनी तरुणीसोबत आसलेल्या युवकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

दरम्यान, एका अन्य गावकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , तरुणी रोज गावातील वीज कापत असे. त्यामुळं गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आम्ही मुलीच्या या कारनाम्यानी त्रस्त झालो होतो.  

Related posts