Suryakumar Yadav And Cheteshwar Pujara Shines In Duleep Trophy ; सूर्यकुमार यादव व चेतेश्वर पुजारा यांची दमदार अर्धशतके

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अलूर : अर्झन नगवास्वाल आणि अतित शेठच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पश्चिम विभागाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मध्य विभागाला पहिल्या डावात १२८ धावांत रोखले. यानंतर दुसऱ्या दिवसअखेर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात ३ बाद १४९ धावा केल्या. यात पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके ठोकली. पश्चिम विभागाकडे आता एकूण २४१ धावांची आघाडी आहे.

पश्चिम विभागाने पहिल्या डावात २२० धावा केल्या. यानंतर अर्झन, अतित आणि चिंतन गाजा यांनी अचूक मारा करून मध्य विभागाच्या फलंदाजांना संधीच दिली नाही. मध्य विभागाचा निम्मा संघ ८१ धावांत माघारी परतला होता. मध्य विभागाकडून ध्रुव जुरेल आणि रिंकू सिंह यांनी आक्रमक खेळ करून धावगती वाढवली. मात्र, या दोघांना अर्धशतक पूर्ण करता आले नाही. अर्झनने पाच, अतितने तीन, तर चिंतनने दोन विकेट घेतल्या. यानंतर दुसऱ्या डावात पृथ्वी साव आणि कर्णधार प्रियांक पंचाल यांना मोठी खेळी करता आली नाही. पुजारा-सूर्याने तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावा जोडल्या. सूर्या ५८ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ५२ धावा काढून बाद झाला. खेळ थांबला तेव्हा पुजारा १०३ चेंडूंत पाच चौकारांसह ५० धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक :
पश्चिम विभाग – पहिला डाव – सर्व बाद २२० आणि दुसरा डाव – ३ बाद १४९ (चेतेश्वर पुजारा खेळत आहे ५०, सूर्यकुमार यादव ५२, सौरभकुमार २-३४) वि. मध्य विभाग – पहिला डाव – ३१.३ षटकांत सर्व बाद १२८ (रिंकू सिंह ४८, ध्रुव जुरेल ४६, अर्झन नगवास्वाल ५-७४, अतित शेठ ३-२७, चिंतन गाजा २-२५).

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

उत्तर विभाग – पहिला डाव – सर्व बाद १९८ आणि दुसरा डाव – २ बाद ५१ वि. दक्षिण विभाग – सर्व बाद १९५ (मयंक अगरवाल ७६, तिलक वर्मा ४६, जयंत यादव ३-३८, वैभव अरोरा ३-५७).

[ad_2]

Related posts