reno-10-series-oppo-enco-air-3-pro-launched-check-price-offers-and-specs-details- | Oppo Reno 10 Series : Oppo चे 3 नवीन स्मार्टफोन लॉन्च; 100W फास्ट चार्जर आणि 64MP पोर्ट्रेट कॅमेरासह मिळतील ‘हे’ फिचर्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Oppo Reno 10 Series Launched : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने Reno 10 सिरीज लाँच केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने Oppo reno 10, 10 Pro आणि 10 Pro Plus स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन्स तुम्ही Oppo आणि Flipkart च्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता. Reno 10 सीरिजमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी, 64MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जर मिळेल.

या तीन स्मार्टफोन्स व्यतिरिक्त कंपनीने Enco Air3 Pro बड्स देखील लॉन्च केले आहेत. तुम्ही ते 11 जुलैपासून खरेदी करू शकाल. बड्स कंपनीने ग्रीन आणि व्हाईट कलरमध्ये हे लॉन्च केले आहेत, ज्याची किंमत 4,999 रुपये आहे. हे इअरबड्स ANC सह येतात.

Oppo Reno 10 Series चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo Reno 10 मध्ये, कंपनी 120hz च्या रिफ्रेश रेटसह 6.74 इंच FHD + AMOLED डिस्प्ले ऑफर करते. स्मार्टफोनमध्ये 67 W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी, Android 13, MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर, 64MP प्रायमरी + 32MP पोर्ट्रेट + 8MP अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे, 6.74-इंचाचा FHD + 3D वक्र AMOLED डिस्प्ले

Oppo Reno 10 Pro मध्ये 120hz च्या रिफ्रेश रेटसह उपलब्ध असेल. स्क्रीनच्या सेफ्टीसाठी गोरिल्ला ग्लास 5 सपोर्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 778G, Android 13, 80W फास्ट चार्जिंगसह 4600 mAh बॅटरी, 50MP IMX890 OIS+ 32MP टेलिफोटो IMX709 2X झूम आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा मिळेल. समोर 32MP कॅमेरा उपलब्ध असेल.

Oppo Reno 10 Pro Plus : 6.74-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर, 100W फास्ट चार्जिंगसह 4700mAh बॅटरी, Android 13, 50MP IMX890 OIS+ 64MP 3X ऑप्टिकल झूम + 358MP कॅमेरा IMX890 OIS+ 64MP. डेल्फीसाठी फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत किती?

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने अद्याप Oppo reno 10 ची किंमत शेअर केलेली नाही. कंपनी या मॉडेलची किंमत 20 जुलै रोजी फ्लिपकार्टवर जाहीर करेल. Oppo reno 10 Pro ची किंमत 39,999 रुपये आहे तर Oppo reno 10 Pro Plus ची किंमत 54,999 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन तुम्ही 13 जुलैपासून खरेदी करू शकता. तुम्ही ओप्पोचे हे स्मार्टफोन एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय इत्यादी बँकांच्या कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% सूट दिली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या :

Nothing 2 : Nothing 2 फर्स्ट लुक आला समोर, या दमदार फिचर्ससह मिळणार आता नथिंग 2

[ad_2]

Related posts