Indian Cricket Team Tour Of West Inidies Test Match Check India Vs West Indies Head To Head Records India Tour Of West Indies 2023 Latest Marathi Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs WI Test 2023 : बुधवारपासून (12 जुलै) भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरोधात दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी 20 सामने खेळणार आहे. बुधवारपासून वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची वेस्ट इंडिजमधील कामगिरी कशी राहिली? सर्वाधिक धावा कुणी चोपल्या… सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या? याबाबत जाणून घेऊयात… 

कधीकाळी वेस्ट इंडिजचा होता दबदबा…

सध्या वेस्ट इंडिज संघाला कमकुवत आणि दुबळा संघ मानले जाते.. पण असा एक काळ होता.. वेस्ट इंडिज क्रिकेटवर राज्य करत होते. वेस्ट इंडिजला पराभूत करणं प्रतिस्पर्धी संघाचं स्वप्न असायचं. भारतीय संघाला वेस्ट इंडिजमध्ये पहिला मालिका विजय मिळवण्यासाठी तब्बल दोन दशकांपर्यंत वाट पाहावी लागली होती. 

वेस्ट इंडिजमधील भारताचा पहिला मालिका विजय कधी? – 

1952-53 मध्ये भारतीय संघ पहिल्यांदा वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये 12 कसोटी मालिका झाल्या आहेत. यामध्ये वेस्ट इंडिज संघाने सात वेळा बाजी मारली आहे. तर भारताला पाच वेळा विजय मिळवता आलाय. भारताला पहिला कसोटी मालिका विजयासाठी 20 वर्षांची वाट पाहावी लागली. भारतीने 1970 मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली आहे. भारताने वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत 51 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताला फक्त नऊ सामन्यात विजय मिळवता आलाय तर वेस्ट इंडिजने 16 सामने जिंकलेत… 26 सामने ड्रॉ राहिलेत.  

मागील 20 वर्षांत भारताचा दबदबा- 

मागील 20 वर्षांत भारतीय संघाचा वेस्ट इंडिजमध्येही दबदबा राहिला आहे. या कालावधीत भारतीय संघाला एकाही मालिकेत पराभव झालेला नाही. यजमान वेस्ट इंडिजने 2002 मध्ये भारतीय संघाचा पराभव केला होता. तेव्हापासून आतापर्यंत वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर भारताला मात देता आलेली नाही. भारतीय संघाने 2019 मध्ये अखेरचा वेस्ट इंडिज दौरा केला होता. आता 4 वर्षानंतर भारत पुन्हा विंडिजच्या दौऱ्यावर गेलाय. 2002 पासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 8 कसोटी मालिका झाल्या आहेत. यामध्ये 4 भारतात आणि 4 वेस्ट इंडिजमध्ये झाल्या आहेत. या आठही कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. मागील 20 वर्षांमध्ये भारतीय संघाचा दबदबा राहिलाय. 

 वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक धावा कुणाच्या?

वेस्ट इंडिजविरोधात सुनील गावसकर यांची बॅट तळपली आहे. गावसकरांनी 27 सामन्यात 2749 धावांचा पाऊस पाडलाय. वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड त्यांच्याच नाववर आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड याचा क्रमांक लागतो. द्रविडने 23 सामन्यात 1978 धावा चोपल्यात.  तिसऱ्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण आहे.. त्याने 22 सामन्यात 1715 धावा काढल्या आहेत. तर 1630 धावांसह सचिन चौथ्या स्थानावर आहे.  

सर्वाधिक विकेट कुणाच्या नावावर ?

वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर आहे. कपिल देव यांनी 25 सामन्यात 89 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अनिल कुंबे याने 17 सामन्यात 74 विकेट घेतल्यात.. तर बिशनसिंह बेदी यांनी 18 सामन्यात 62 विकेट घेतल्या आहेत.

आणखी वाचा :

India Tour of West Indies : मिशन वेस्ट इंडिज! 12 जुलैपासून कॅरेबिअनसोबत भिडणार रोहित अॅण्ड कंपनी, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

[ad_2]

Related posts