Latur Ganpati Visarjan Controversial Song Was Played On DJ Case Registered Against Four People

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लातूर: विसर्जन मिरवणुकीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजवल्या प्रकरणी लातूरच्या (Latur) उदगीर शहरातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणरायांचे सातव्या दिवशी सोमवारी विसर्जन करण्यात आले. दरम्यान, यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी अधिसूचना काढली होती. त्यानुसार,  सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, असे असतानाही विसर्जन मिरवणुकीत डीजे लावून आक्षेपार्ह गाणे वाजवण्यात आल्याने एका गणेश मंडळाच्या चौघा पदाधिकाऱ्यांविरुद्ध उदगीर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याकडून संपूर्ण जिल्हाभर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी उदगीर शहरातील सर्व गणेश मंडळांनी गणरायांची मिरवणुका काढून वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला.  यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाने आक्षेपार्ह गाणी सार्वजनिक ठिकाणी वाजवले. त्यामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण? 

सोमवारी उदगीरमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास परवानगी नसताना सार्वजनिक ठिकाणी डीजे लावून कर्कश्श आवाज करीत आक्षेपार्ह गाणे लावण्यात आले होते. नागरिकांना त्रास होईल, असे उपद्रवी कृत्य करत शहरातील चौबाऱ्याकडून कॉर्नर चौकाकडे जाताना निलंगे लाईट डेकोरेशनच्या समोर सार्वजनिक रोडवर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत असताना काही तरुण पोलिसांना मिळून आले. त्यामुळे यावरून पोलीस नाईक राजीव सीताराम कट्टेवार यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जवळपास 1 हजार 284 गणेश मंडळ…

आपल्या लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. आज निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात यंदा जवळपास 1 हजार 284 गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. तर, दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. दुपारनंतर सर्वच महत्वाचे विसर्जन मिरवणुका निघायला सुरवात होणार आहे. 

पोलिसांकडून तगडा बंदोबस्त…

आज मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप दिला जात आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात देखील आज मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका निघत असतात. याच पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी आज रस्त्यावर असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Ganpati Visarjan 2023 Live Updates: बाप्पा चालले गावाला…; छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील बाप्पांना आज निरोप

[ad_2]

Related posts