Khalistan Threat On World Cup 2023 Gurpatwant Singh Pannu Threatens New Video Viral Hardeep Singh Nijjar Murder Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pannu Threatens with New Video : भारतात होणाऱ्या किक्रेट विश्वचषक 2023 (World Cup 2023) वर खलिस्तानी दहशतवादाचं (Khalistani Attack) सावट आहे. खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) गुरपरतवंत पन्नूने (Gurpatwant Singh Pannu) विश्वचषकाच्या (World Cup 2023 in India) सामन्यावर हल्ल्याची धमकी (Khalistani Terrorist Attack) दिली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळ तीव्र होताना दिसत आहे.

विश्वचषकावर दहशतवादाचं सावट! 

आता खलिस्तानी संघटना सिख फॉर जस्टिसचा प्रमुख पन्नूने निज्जरच्या हत्येचा बदला म्हणून विश्वचषकाच्या सामन्याला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. पन्नूचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्याने पंतप्रधान मोदींवरही आरोप केले आहेत. अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यावर खलिस्तानी हल्ला करण्याचा इशारा पन्नूने दिला आहे.

खलिस्तानी पन्नूकडून भारताला हल्ल्याची धमकी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओमध्ये खलिस्तानी दहशतवादी पन्नू दिल्लीला खलिस्तान बनवणार असल्याचं म्हणत आहे. खलिस्तानी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येला भारत जबाबदार असल्याचं पन्नूने म्हटलं आहे. यामुळे अहमदाबादमध्ये 6 ऑक्टोबरपासून सुरू होणारा आयसीसी विश्वचषकावर खलिस्तान्यांचा निशाणा असल्याचं पन्नूने म्हटलं आहे.. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी

खलिस्तानी दहशतवादी पन्नूने व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, ”पंतप्रधान मोदी तुम्ही शहीद निज्जरच्या हत्येसाठी जबाबदार आहात. सिख फॉर जस्टिस याचा बदला घेईल. आमचं लक्ष्य अहमदाबाद येथे 6 ऑक्टोबरला होणाऱ्या वर्ल्ड कपच्या सामन्यावर आहे.” पन्नूच्या नव्या व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ माजली आहे.

पन्नूविरोधात अनेक राज्यांमध्ये 16 गुन्हे दाखल

शीख फॉर जस्टिस या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख असलेल्या पन्नूला गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलं होतं. एका नवीन गुप्तचर अहवालात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू त्याच्या अजेंड्याबद्दल सांगत आहे. सुरक्षा यंत्रणांनी नुकतेच एक नवे दस्तावेज तयार केले आहेत. यामध्ये पन्नूच्या कारवाया आणि धर्माच्या आधारे देशाची फाळणी करण्याच्या तिच्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

भारत आणि कॅनडामध्ये तणाव

18 जून रोजी हरदीप सिंह निज्जर कॅनडातील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी हरदीप सिंह निज्जरवर अंधाधुंद गोळीबार केला. हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो (Justin Trudeau) यांनी केला. भारताने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी कॅनडाच्या यंत्रणाकडून तपास सुरु आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts