India vs West Indies Test Series Throwback Story ; चंदरपॉल काही भारताचा पिच्छा सोडत नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : एक वेळ वेस्ट इंडिजचे १० फलंदाज बाद होतील, पण शिवनारायण चंदरपॉल नाही असे म्हटले जात होते. कारण चंदरपॉल जर फलंदाजीला आला तर तो एकटाच दिवसभर खेळू शकतो, यावर प्रतिस्पर्धी संघाचाही विश्वास होता. भारताविरुद्धच्या सामन्यात तर तो हमखास खेळायचा. त्यामुळे भारतीय संघाने त्याची धास्ती घेतली होती. पण चंदरपॉल हे नाव काही भारतीय संघाचा पिच्छाच सोडत नसल्याचे आता समोर आले आहे. वेस्ट इंडिजचा भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात आला. त्यावेळी चंदरपॉल हे नाव चाहत्यांच्या नजरेस पडले आणि त्यांना नक्कीच तो जुना काळ आठवला असेल. कारण वेस्ट इंडिजच्या या संघातही चंदरपॉल आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा १२ जुलैला सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजबरोबर दोन कसोटी, तीन वनडे आणि पाचच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आता वेस्ट इंडिजचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात आता चंदरपॉलचे नाव घेण्यात आले आहे

कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना आपल्या समोर लोटांगण घालायला कसं लावायचं, ही गोष्ट कोणीही चंदरपॉल याच्याकडून शिकण्यासारखी होती. सुरुवातीला चंदरपॉल हा मधल्या फळीत फलंदाजीला यायचा. पण तो बाद होतच नाहीत हे पाहिल्यावर संघाने त्यांना सलामीवीर बनवत बढती दिली. पण चंदरपॉल सलामीला आला तरी तो ११ व्या फलंदाजाबरोबर खेळपट्टीवर असायचा. त्यामुळे चंदरपॉलला बाद कसे करायचे, हा विचार करून गोलंदाज निराश व्हायचे. चंदरपॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली खरी. पण तरीही चंदरपॉल हे नाव वेस्ट इंडिजच्या संघात कायम आहे. कारण शिवनारायण यांचा मुलगा तागेनारायण चंदरपॉल हा सध्याच्या वेस्ट इंडिजच्या संघात आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

विंडीज संघ ः क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जेर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), अॅलिक अॅथनेझ, तागेनारायण चंदरपॉल, राहकीम कॉर्नवॉल, जोशुआ डिसिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रायफर, केमार रोच, जोमेल वॉरिकन. राखीव : तेविन इमलाच, अकीम जॉर्डन.

[ad_2]

Related posts