[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अजिंक्यबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माही आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने अजिंक्यला काही निवडक प्रश्न विचारले. यावेळी रोहितने अजिंक्यला एक महत्वाचा प्रश्न विचारला. रोहितने यावेळी अजिंक्यला विचारले की, ” अजिंक्य, यापूर्वीही ती वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आला आहेस. त्यामुळे तु वेस्ट इंडिजमधील सर्व गोष्टी चांगल्याच जाणतोस, त्यामुळे सध्याच्या घडीला भारतीय संघात जे युवा खेळाडू आहेत, त्यांना तु काय सल्ला देशील? “
अजिंक्यच्या प्रश्नावर रोहित म्हणाला की, ” भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी म्हणाल किंवा अन्य खेळाडूंसाठी माझा एकच सल्ला असेल. वेस्ट इंडिजमध्ये संयम फार महत्वाचा असतो. कारण वेस्ट इंडिजमधील वातावरण आणि खेळपट्ट्या अशा असतात की, त्यामुळे मैदानात खेळताना फलंदाजांनी संयम ठेवणे हे फार महत्वाचे असते. त्यामुळे वेस्ट इंडिजमझ्ये संयम ठेवला तर नक्कीच खेळाडूंना यश मिळू शकते.”
भारताच्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्याची सुरुवात आता कसोटी सामन्याने होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना हा १२ जुलैला होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर यावेळी सर्वांना प्रश्न पडला असेल तो संघ निवडीचा. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा संघ निवडतो, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील.
[ad_2]