IPL 2023 RR Won The Match By Four Wicket Against PBKS In Match 66 At HPCA Stadium 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PBKS vs RR, IPL 2023 : आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामातील 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पंजाब किंग्सचा (Punjab Kings) चार विकेट्सने पराभव केला. यासोबतच राजस्थानची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब संघाने 20 षटकांत पाच गडी बाद 187 धावा केल्या. त्यानंतर राजस्थान संघाने दोन चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि दविदत्त पडिक्कल यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यासोबतच हिटमायरने 46 धावांची चमकदार खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

राजस्थानकडून पंजाबचा पराभव

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये सामन्यात पंजाब किंग्सला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबला राजस्थान रॉयल्सने चार गडी राखून पराभूत केलं. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा रोमांचक सामना पार पडला. पंजाबने 20 षटकांत 5 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 19.4 षटकांत 6 बाद 189 धावा केल्या.

राजस्थानने चार विकेट्सने सामना जिंकला

राजस्थान रॉयल्सने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव केला. या विजयासह राजस्थानच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. त्याचवेळी पंजाब किंग्सच्या पदरी मात्र निराशा आली. या पराभनानंतर पंजाब किंग्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज होती. ध्रुव जुरेल आणि ट्रेंट बोल्ट यांनी पहिल्या तीन चेंडूत चार धावा केल्या. यानंतर जुरेलने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून संघाल सामना जिंकून दिला.

कर्णधार संजू सॅमसन दोन धावांवर तंबूत परतला. जोस बटलरचाही खराब फॉर्म पाहायला मिळाला. त्याला खातंही उघडता आलं नाही. पंजाबकडून कागिसो रबाडाने दोन गडी बाद केले. सॅम करन, अर्शदीप सिंह, नॅथन एलिस आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सॅम करन आणि जितेश शर्माची संयमी खेळी

पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्स संघाची सुरुवात खराब झाली. पंजाब संघाने पाच गडी गमावून 187 धावांचा पल्ला गाठला. पंजाब किंग्सनं राजस्थान रॉयल्सला 188 धावांचं लक्ष्य दिलं. पावर प्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांनी पुरतं नमवलं.

पंजाबचं राजस्थानला 188 धावांचं आव्हान

पंजाब किंग्सकडून सॅम करनने 31 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. जितेश शर्माने 44 आणि शाहरुख खानने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. अथर्व तायडेने 19 आणि शिखर धवनने 17 धावांचे योगदान दिलं. लियाम लिव्हिंगस्टोनने नऊ आणि प्रभसिमरन सिंहने दोन धावा केल्या. राजस्थानकडून नवदीप सैनीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना बाद केलं. ट्रेंट बोल्ट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळालं.



[ad_2]

Related posts