[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
PBKS vs RR Live Score, IPL 2023 Match 66 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये आज 66 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात संध्याकाळी 07:30 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली अंधुकशी आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांचे 13 सामन्यांत समान 12 गुण आहेत, पण उत्तम रनरेटच्या आधारावर राजस्थानचा संघ पंजाबपेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, पण त्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागेल.
कोणत्या संघाचं पारडं जड?
आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान राजस्थाननं 14 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पंजाबनं 11 सामने जिंकले आहेत. मात्र, 16व्या मोसमात पंजाबनं केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा वरचष्मा दिसत आहे. पण यावेळी आरआर आपला दबदबा कायम ठेवणार की पंजाब दुहेरी हेडरवरही विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
हेड टू हेड आकडेवारी
25 सामने
पंजाब किंग्स | 11 विजय | राजस्थान रॉयल्स | 14 विजय |
पंजाब किंग्स | 14 पराभव | राजस्थान रॉयल्स | 11 पराभव |
सर्वश्रेष्ठ स्कोर | 223 | सर्वाधिक स्कोअर | 226 |
सर्वाधिक कमी स्कोअर | 124 | सर्वाधिक कमी स्कोअर | 112 |
PBKS vs RR IPL 2023: अशी असू शकते पंजाब विरुद्ध राजस्थान टीमची प्लेईंग-11
पंजाब किंग्सचा संभाव्य संघ
शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, लियम लिविंगस्टोन, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चाहर, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ
यशस्वी जायस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पाडिक्कल, केएम आसिफ, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल
प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो राजस्थान
आयपीएल 2023 ( IPL 2023) मध्ये सध्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी सात संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स हा एकमेव संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या शर्यतीमधून बाहेर गेले आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघ सध्या 12 गुणांसह आयपीएल पॉइंट टेबलवर (IPL 2023 Points Table) सहाव्या क्रमांकार आहे. गुणतालिकेत सध्या सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थान संघांसाठी प्लोऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी धुसर आशा कायम आहे.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) ‘जिओ सिनेमा’ ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
[ad_2]