[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आयपीएलचे प्रमुख अरुण धुमल यांनी आशिया कप कार्यक्रम निश्चित झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. आयसीसीच्या कार्यकारीणीची गुरुवारी बैठक होणार आहे. डर्बनमधील बैठकीपूर्वी शहा आणि अश्रफ यांची चर्चा झाली. त्यात स्पर्धेस अंतिम स्वरुप देण्यात आले. पाकिस्तान बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया कपसाठी हायब्रीड मॉडेल तयार केले होते. आश्रफ यांनी पाक बोर्डाचे अध्यक्ष झाल्यावर या हायब्रीड मॉडेलला विरोध केला होता. मात्र शहा यांच्यासह झालेल्या चर्चेनंतर त्यांनी स्पर्धा कार्यक्रमास मंजूरी दिली.
शहा आणि अश्रफ यांची दुबईत बैठक झाली. त्यात आशिया कपचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. यापूर्वी ठरल्यानुसारच स्पर्धा होईल. स्पर्धेतील चार प्राथमिक साखळी लढती पाकिस्तानात होतील. त्यानंतरचे नऊ सामने श्रीलंकेत होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत श्रीलंकेतच होणार आहेत, असे धुमल यांनी सांगितले. ही लढत दम्बुला येथे होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. येथेच २०१०च्या स्पर्धेतील भारत-पाक लढत झाली होती.
तो दावा खोटा
आशिया कपमधील भारताच्या लढतीही पाकिस्तानात होणार असल्याचा दावा पाकिस्तानचे क्रीडा मंत्री मझारी यांनी केली आहे. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे भारतीय बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हायब्रिड मॉडेल ठरले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पाकिस्तान बोर्डातील अंतर्गत घडामोडींकडे आम्ही लक्ष देत नाही. हायब्रीड मॉडेलला पाक बोर्डानेही मंजूरी दिली आहे आणि ते जास्त महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.
वर्ल्ड कपसाठी पाक येणारच
वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सहभागाबाबत सदस्य सहभाग करारावर पाकिस्तानने २०१५ मध्येच स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पाकने स्पर्धा सहभागाबाबतचा करार मान्य केला आहे. त्याचवेळी आयसीसी निश्चित करणाऱ्या ठिकाणी स्पर्धेत खेळणे बंधनकारक असते. अर्थात अंतिम निर्णय होताना सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असतो. सुरक्षेचा मुद्दा नसताना माघार घेतल्यास संबंधित क्रिकेट बोर्डावर आर्थिक तसेच कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे भारतीय बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र हा करार २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अमलात येत नाही, असेही बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहा पाकिस्तानला जाणार?
भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा आशिया कप स्पर्धेच्या कालावधीत पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या कालावधीत पाकिस्तानला येण्याचे निमंत्रण आश्रफ यांनी शहा यांना दिले आणि ते त्यांनी स्वीकारले असल्याचे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांनी दिले आहे. आश्रफ वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या कालावधीत भारतात जाणार आहेत, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
पाकची मायदेशात एकच लढत?
पाकिस्तान आशिया कपचे यजमान आहेत. मात्र ते या स्पर्धेतील एकच लढत मायदेशात खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे ही लढत श्रीलंकेत होईल. पाकिस्तानची नेपाळविरुद्धची साखळी लढत मायदेशात होणार आहे. त्याचवेळी श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या गटातील तीनही साखळी लढती पाकिस्तानात होण्याची शक्यता आहे.
लक्षवेधक
– भारताच्या दम्बुला स्टेडियमवर १८ वनडेमध्ये १० विजय आणि ८ पराभव
-दाम्बुला स्टेडियमवरील पाकिस्तानविरुद्धच्या एकमेव सामन्यात भारताचा विजय
– पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील ही लढत १९ जून २०१० या दिवशी
– पाकिस्तानला २६७ धावांत रोखल्यावर भारताकडून ४९.५ षटकांत ७ विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य साध्य
– सलमान बट (७४) आणि कामरान अकमलचे (६७) अर्धशतक, पण प्रवीण कुमार, झहीर खान, हरभजन सिंगने पाकला रोखले
– सामनावीर गौतम गंभीरच्या आक्रमक ८३ धावांच्या खेळीस महेंद्रसिंग धोनीच्या ५६ धावांची साथ. त्या सामन्यात रोहित शर्माच्या २२, तर विराट कोहलीच्या १८ धावा
[ad_2]