[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
यशस्वी हा आपल्या पहिल्या शतकानंतर भावूक झाला होता. क्रिकेटचे वेड जपण्यासाठी तो एकेकाळी पाणीपुरी विकत होता. पण त्याने स्वप्न पाहायचे सोडले नाही. स्वप्नाचा त्याने ध्यास घेतला होता आणि त्याने आपले हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यामुळे आपले हे स्वप्न साकार झाल्यावर त्याला आपल्या भावना व्यक्त करताना भरून आले होते. पण हे खास शतक त्याने आपल्या संघर्षात साथ देणाऱ्या व्यक्तींना समर्पित केले आहे.
यशस्वी म्हणाला की, ” माझ्यासाठी हा फार भावुक क्षण आहे. कारण माझे स्वप्न सत्यात तर उतरले आहेच, पण अशी सुखद गोष्ट माझ्याबरोबर घडेल याचा विचारही मी केला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी हा फार मोठा क्षण आहे. पहिल्याच सामन्यात शतक झाले आहे. माझा आतापर्यंतचा प्रवास हा संघर्षमय होता. पण हा संघर्ष सुरु असताना त्यांनी मला नेहमीच साथ दिली, पाठिंबा दिला. त्यामुळे माझे हे खास शतक त्यांच्यासाठी असेल. हे माझे पहिले शतक मी माझ्या आई-बाबांना समर्पित करतो. कारण त्यांनी माझ्यासाठी बरेच कष्ट घेतले आहेत. त्यामुळे या आनंदाच्या क्षणी मी त्यांना विसरू शकत नाही. त्यामुळे हे शतक माझ्या आई-वडिलांसाठी असेल.”
यशस्वीने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा तो १७ वा भारतीय क्रिकेटडपटू ठरला आहे. यशस्वीचे शतक तर झाले पण आता त्याला आस लागली असेल ती द्विशतकाची. जर यशस्वीने या सामन्यात द्विशतक झळकावले तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम प्रस्थापित होऊ शकतो.
[ad_2]