First Thing Yashasvi Jaiswal Did After Taking The Man Of The Match Award To The Hotel, Watch Video ; सामनावीर पुरस्कार हॉटेलमध्ये घेऊन गेल्यावर यशस्वीने प्रथम काय केलं, पाहा भन्नाट व्हिडिओ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : यशस्वी जैस्वाल हा पहिल्याच सामन्यात भारतासाठी नायक ठरला. या सामन्यात सर्वाधिक धावा केल्यामुळे त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. यशस्वी हा पुरस्कार घेऊन आपल्या हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमधल्या रुममध्ये गेल्यावर यशस्वीने यावेळी जी पहिली गोष्ट केली ते पाहून सर्वांनाच त्याचा अभिमान वाटेल. यशस्वीचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.यशस्वीचा प्रवास हा संघर्षपूर्ण होता. क्रिकेटची आवड जपण्यासाठी त्याने बऱ्याच गोष्टी केल्या. कुटुंब चालवण्यासाठी त्याने पाणीपुरीही विकली. पण आता यशस्वी हा यशाची शिखरं चढायला लागला आहे. पहिल्याच सामन्यात त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. पहिल्या सामन्यात त्याने सर्वाधिक १७१ धावा केल्या आणि त्यामुळेच त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार घेऊन यशस्वी आपल्या हॉटेलमध्ये गेला आणि त्यावेळी त्याचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

सामनावीर पुरस्कार घेऊन हॉटेलमध्ये जात असताना यशस्वीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये यशस्वीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. आतापर्यंतचा संघर्ष यावेळी त्याच्या डोळ्यासमोर आलेला पाहायला मिळाला. यशस्वी या व्हिडिओत मनाासून बोलत असल्याचे पाहायला मिळाले. यशस्वी जेव्हा हॉटेलमधल्या आपल्या रुममध्ये पोहोचला तेव्हा त्याने हा पुरस्कार बंद पेटीतून बाहेर काढला. यावेळी सर्व प्रथम त्याने देवाचे आभार मानले. यशस्वीने पहिल्या सामन्यात घवघवीत यश मिळवले. या वयात तरुणांचे पाय जमिनीवर राहत नाहीत, असे म्हटले जाते. पण यशस्वीचे पाय किती जमिनीवर आहेत आणि त्याला कोणताही अहंकार नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्याबाबत जास्त न बोलता त्याने देवाचे आभार मानले आहेत. यशस्वीच्या या एका गोष्टीवर चाहते फिदा झाले आहेत आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या एका कृतीने यशस्वीने सर्वांची मनं जिंकली आहेत.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

यशस्वीचा हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Related posts