Virat Kohli | Virat Kohli : किंग कोहलीचा वर्ल्डकपच्या 48 वर्षांच्या इतिहासात असाही भीम पराक्रम; श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेच्याच खेळाडूचा विक्रम मोडित

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात प्रत्येक चेंडूमागे विक्रम करत असलेल्या किंग विराट कोहलीनं आज आणखी एक भीम पराक्रम केला आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात नाॅन ओपनर म्हणून विराट कोहलीने वर्ल्डकपच्या इतिहासा सर्वाधिक 13 अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. आजवर वर्ल्डकपच्या इतिहासात श्रीलंकेचा कुमार संगकारा सोडून हा पराक्रम कोणालाच करता आलेला नव्हता.  

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. त्याचवेळी श्रीलंकेने धनंजय डी सिल्वाच्या जागी दुषण हेमंतला संघात संधी दिली. 

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली पण पहिल्याच षटकात दिलशान मदुशंकाने टीम इंडियाला मोठा धक्का दिला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर विराट कोहली क्रिजवर आला, ज्याने झटपट अर्धशतक झळकावून यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.

2023 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा कोहली हा चौथा फलंदाज आहे. यासह तो सचिन तेंडुलकरच्या पुढे गेला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 7 वेळा 1000 वनडे धावा करण्याचा विक्रम होता, जो विराट कोहलीने मोडला आहे.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा 1000+ एकदिवसीय धावा

8 – विराट कोहली (2011-14, 2017-19, 2023)*
7 – सचिन तेंडुलकर (1994, 1996-98, 2000, 2003, 2007)

2023 मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा

शुभमन गिल- 1365
पथुम निस्संका- 1108
रोहित शर्मा- 1060
विराट कोहली- 1004
डॅरिल मिशेल- 998

आशियातील सर्वात जलद 8000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा खेळाडू

159 डाव – विराट कोहली*
188 डाव – सचिन तेंडुलकर
213 डाव – कुमार संगकारा
254 डाव – सनथ जयसूर्या

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोच्च 50+ धावा

21 – सचिन तेंडुलकर (44 डाव)
13 – विराट कोहली (33 डाव)*
12 – कुमार संगकारा (35 डाव)
12 – शकिब अल हसन (35 डाव)
12 – रोहित शर्मा (24 डाव)

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts