Adr Report Maharashtra 114 Mla Faces Serious Criminal Cases 44 Per Cent Mla Across India Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: देशातील 44 टक्के आमदारांवर गुन्हे दाखल असून त्यापैकी बहुसंख्य आमदारांवर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) त्याच्या अहवालात दिली आहे. ही माहिती त्या आमदारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या स्वयंघोषणापत्रातून दिली असल्याचंही एडीआरने स्पष्ट केलं आहे. एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) ने आमदारांच्या स्वयंघोषणापत्राचा अभ्यास करुन ही माहिती प्रकाशित केली आहे. 

महाराष्ट्रातील 284 आमदारांपैकी 175 आमदारांवर फौजदारी गुन्हे (Criminal Charges On MLA MP) दाखल आहेत. तर 114 आमदारांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं त्या आमदारांनी त्याच्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

एडीआरने केलेल्या विश्लेषणामध्ये 28 राज्य विधानसभा आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा देणाऱ्या 4,033 आमदारांपैकी एकूण 4,001 आमदारांचा समावेश आहे. त्यापैकी 1,136 किंवा सुमारे 28 टक्के आमदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.

ADR Report On Criminal MLA : निवडणूक प्रतिज्ञापत्रकात नमूद असलेले गुन्हे 

  • केरळमध्ये, 135 पैकी 95 आमदारांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं आहे. ही संख्या एकूण संख्येच्या 70 टक्के इतकी आहे.
  • त्याचप्रमाणे बिहारमध्ये 242 पैकी 161 आमदार (67 टक्के)
  • दिल्लीत 70 पैकी 44 आमदार (63 टक्के),
  • महाराष्ट्रात 284 पैकी 175 आमदार (62 टक्के),
  • तेलंगणामध्ये 118 पैकी 72 आमदार (61 टक्के),
  • तामिळनाडूमध्ये, 224 पैकी 134 आमदारांवर (60 टक्के) त्यांच्या प्रतिज्ञापत्रात स्वयंघोषित गुन्हेगारी प्रकरणे दाखल असल्याचं सांगण्यात आलंय. 

गंभीर गुन्हे दाखल असलेले आमदार

  • दिल्लीत 70 पैकी 37 आमदार (53 टक्के),
  • बिहारमध्ये 242 पैकी 122 आमदार (50 टक्के),
  • महाराष्ट्रातील 284 पैकी 114 आमदार (40 टक्के),
  • झारखंडमध्ये 79 पैकी 31 आमदार (39 टक्के),
  • तेलंगणात 118 पैकी 46 आमदार (39 टक्के),
  • उत्तर प्रदेशातील 403 पैकी 155 आमदार (38 टक्के)

एडीआरने केलेल्या विश्लेषणातून महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित अस्वस्थ करणारी आकडेवारीही उघड झाली आहे. एकूण 114 आमदारांवर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. तर 14 आमदारांनी त्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे नोंद असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. 

 

[ad_2]

Related posts