[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
यशस्वी जयस्वाल या पूर्वी दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होता पण स्वत:साठी एक आलिशान घर घेण्याचे त्याचे स्वप्न होते. यशस्वीने आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन हे स्वप्न पूर्ण केले. यशस्वी सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे पण त्याच्या भावाने एका मुलाखतीत सांगितले की, ‘यशस्वीला नेहमीच स्वतःचे घर घ्यायचे होते. त्याचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे.’
काय म्हणाला यशस्वीचा भाऊ?
यशस्वीचा भाऊ तेजस्वी म्हणाला, ‘वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेल्यानंतरही यशस्वी नवीन घरात शिफ्ट होण्याबाबत सतत अपडेट्स घेत होता. परत आल्यावर त्याला जुन्या २ बीएचकेच्या घरात राहायचे नव्हते. त्याच्या कुटुंबालाही स्वतःचे घर असावे, हे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न होते. मुंबईत स्वत:चे घर असण्याचे महत्त्व तुम्ही समजू शकता.’
वडील भूपेंद्र कांवड यात्रेला
यशस्वीचे वडील भूपेंद्र जयस्वाल, मूळचे उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील, आपल्या मुलाच्या पदार्पणाच्या कसोटीतील दमदार कामगिरीमुळे खूप खूश आहेत. भूपेंद्र जयस्वाल म्हणाले की, यशस्वीच्या शतकाचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आणि आनंद आहे. म्हणूनच आम्ही कांवड घेऊन झारखंडमधील बाबा बैजनाथ धाम येथे भगवान भोलेनाथांना जल अर्पण करण्यासाठी जात आहोत.
पदार्पणात चमकला यशस्वी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यशस्वीने १७१ धावांची दमदार खेळी केली. आपल्या डावात त्याने ३८७ चेंडूंमध्या त्याने १६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याच्याकडे द्विशतक झळकावण्याची मोठी संधी होती पण ती हुकली. कसोटी पदार्पणापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये शानदार कामगिरी केली. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वीने आयपीएलमध्ये दमदार शतकही झळकावले.
[ad_2]