‘सर्वात जास्त मोमोज कोणं खातं पाहू,’ मित्रांशी लावलेल्या पैजेत तरुणाने गमावला जीव, आधी बेशुद्ध पडला अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बिहारच्या गोपालगंज येथे मित्रांसह मोमोज खाण्याची स्पर्धा लावणं एका तरुणाला महागात पडलं आहे. मोमोज खाण्याच्या या स्पर्धेत तरुणाने आपली जीव गमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने मित्रांसह पैज लावल्यानंतर मोठ्या प्रमाणात मोमोज खाल्ले होते. मात्र मोमोज खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती. यानंतर त्याचा मृत्यू झाला. पण मुलाच्या वडिलांनी मुलाला मोमोजमधून विष देण्यात आल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या गोपालगंज येथे मित्रांसह मजा मस्ती करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. मित्रांनी त्याच्यासह ‘Momos Eating Challenge’ ठेवलं होतं. यावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, गोपालगंज येथील 25 वर्षीय बिपीन कुमार पासवान मित्रांसह मोमोज खाण्यासाठी पोहोचला होता. 

बिपिनची मित्रांसह सर्वाधिक मोमोज कोण खाणार हे पाहूयात अशी पैज लागली होती. यावेळी बिपीनने खूप सारे मोमोज खाल्ले होते. ज्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

काय आहे प्रकरण?

बिपीन कुमार पासवान एका मोबाइल रिपेअरिंग दुकानात काम करत होता. गुरुवारी तो दुकानात पोहोचला होता. काही वेळाने त्याची मित्रांशी भेट झाली. मित्रांनी यावेळी मोमोज खाण्याची स्पर्धा ठेवली. यानंतर मोमोजच्या स्टॉलवर जाऊन त्यांनी खाण्यास सुरुवात केली. यावेळी बिपीनने मोठ्या प्रमाणात मोमोज खाल्ले.

मोठ्या प्रमाणात मोमोज खाल्ल्याने बिपीनची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. बिपीनला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांना त्याला मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

बिपीनच्या वडिलांचे गंभीर आरोप

बिपीनच्या वडिलांनी मात्र मुलाचा मृत्यू जास्त मोमोज खाल्ल्याने झाल्याचं मानण्यास नकार दिला आहे. मुलाला विष देण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. बिपीनच्या मित्रांवरच त्यांनी  हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. 

बिपीनच्या वडिलांचं म्हणणं आहे की, त्याच्या मित्रांनी जाणुनबुजून मोमोज खाण्याची स्पर्धा ठेवली होती. यानंतर त्याला त्यातून विष देण्यात आलं. पोलिसांनी मात्र अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलीस सध्या तपास करत आहे. पोलीस शवविच्छेदन अहवाल मिळण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल.

Related posts