[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याला विम्बल्डनमध्ये पराभवाची धुळ चाखावी लागलीय. कार्लोस अल्कराज याने जोकोविचचा पराभव करत दुसरे ग्रँड स्लॅम जिंकले. या अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोसने विम्बल्डन चॅम्पियनशीप 2023 वर स्वताचं नाव कोरलंय. काल लंडनमध्ये हा अंतिम सामना पार पडला. तर पाच सेटपर्यंत झालेल्या रोमांचक सामन्यात कार्लोस अल्कराज याने 1-6, 7-6, 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळवला. जोकोव्हिचने चार विम्बल्डनमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. तसंच त्याने या वर्षी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे अंतिम लढतीत त्याचंच पारडं जड मानले जात होतं. मात्र त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन जेतेपदांशी बरोबरी साधण्याची ही संधी यावेळी होती. पण अल्कराझच्या उत्कृष्ट खेळामुळे जोकोव्हिचची ही संधी हुकली. या स्पर्धेनंतर अल्कराजचं सर्वच क्षेत्रातून कौतुक होताना दिसतंय.
[ad_2]