Indian Cricket Team Player Virat Kohli Viral Gym Photo Ind Vs Wi Marathi Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli Viral Photo : पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला. 20 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया यांच्यामध्ये दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना होणार आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दोन्ही संघ आमने-सामने असतील. अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी तयारी सुरु केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरले. पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहलीही तयारी लागला आहे. विराट कोहली नेटमध्ये कसून सराव करत आहे. त्याशिवाय जिममध्ये विराट कोहली परिश्रम घेत आहे.  जिममध्ये व्यायाम करतानाचा विराट कोहलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

विराट कोहली फिटनेसबाबत नेहमीच जागृक असतो. तो जिममध्ये परिश्रम करताना अनेकदा दिसलाय. वेस्ट इंडिजविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वीही विराट कोहलीने जिममध्ये परिश्रम केले. त्याचा जिममधील फोटो व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केलाय. नेटकऱ्यांकडून या फोटोला पसंती मिळत आहे.

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये होणार दुसरा कसोटी सामना – 

डोमिनिका येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. अवघ्या तीन दिवसात पहिला कसोटी सामना संपला. या सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली. विराट कोहलीने डोमिनिका कसोटी सामन्यात 182 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 76 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. विराट कोहलीला शतक झळकावण्यात अपयश आलेय. आता दुसऱ्या कसोटी विराट कोहलीकडून चाहत्यांना शतकाची आपेक्षा आहे. अनेक दिवसांपासून विराट कोहलीला विदेशात शतक झळकावता आलेले नाही. 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या कसोटी सामन्यात विराट कोहलीकडून शतकाची आपेक्षा आहे. दोन कसोटी सामन्यात तीन वनडे आणि 5 टी20 सामन्याची मालिका होणार आहे. 

आणखी वाचा :

Pakistan Cricket Team : पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण, बाबर आझम, शाहीन आफ्रिदी की शोएब अख्तर?

Team Inda : विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी खूशखबर, 4 महत्वाचे खेळाडू दुखापतीतून सावरले, लवकरच करणार कमबॅक

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ, फ्लाईट्स तिकिटात 300 टक्केंनी वाढ, मुंबई-अहमदाबादचे तिकिट 22 हजार रुपये



[ad_2]

Related posts