Chennai Super Kings Have Qualified For The IPL 2023 Playoffs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chennai Super Kings have qualified for the IPL 2023 Playoffs : दिल्लाचा पराभव करत धोनीच्या चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. चेन्नईने 14 सामन्यात 17 गुणांची कमाई केली आहे. चेन्नईला आठ सामन्यात विजय मिळालाय. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा चेन्नई दुसरा संघ आहे. याआधी गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चेन्नई सध्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पण लखनौ आणि कोलकाता यांच्यातील सामन्यावर चेन्नईने दुसरे स्थान अवलंबून आहे. लखनौने कोलकात्याचा विराट पराभव केल्यास चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर घसरु शकतो.  लखनौने कोलकात्याचा पराभव केल्यास.. चेन्नई आणि लखनौ यांच्यात समान गुण होतील.. अशात नेट रनरेटच्या आधावर क्वालिफायर एक मध्ये प्रवेश मिळेल. लखनौला दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी कोलकात्याचा 97 धावांनी पराभव करावा लागेल.

यंदाच्या हंगामात चेन्नईच्या संघाने सन्मानजक कामगिरी केली आहे. चेन्नईची फलंदाजी कमकुवत होती. पण धोनीने कमकुवत गोलंदाजाची असतानाही प्लेऑफमध्ये प्रवेश केला.  

यंदाच्या हंगामात चेन्नईची कामगिरी कशी राहिली ?

31 मार्च 2023 –  चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. 

3 एप्रिल 2023 – चेन्नईने लखनौचा 12 धावांनी पराभव केला. 

8 एप्रिल 2023 – चेन्नईने मुंबईचा एकतर्फी पराभव केला. चेन्नईने मुंबईवर सात विकेटने विजय मिळवला. या सामन्यात अजिंक्य रहाणे याने वादळी फलंदाजी केली. 

12 एप्रिल 2023 –  राजस्तान रॉयल्सने चेन्नईचा तीन धावांनी पराभूत केले. 

17 एप्रिल 2023 – चेन्नईने आरसीबीचा आठ धावांनी पराभूत केले. 

21 एप्रिल 2023 – चेन्नईने हैदराबादचा सात विकेटने पराभव केला. 

23 एप्रिल 2023 – चेन्नईने कोलकात्याला 49 धावांनी हरवले. 

27 एप्रिल 2023- राजस्थानने चेन्नईचा 32 धावांनी पराभव केला.

30 एप्रिल 2023 – अटीतटीच्या लढतीत पंजाबने चेन्नईचा चार विकेटने पराभव केला. 

3 मे 2023 – लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आले. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सात बाद 125 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. 

6 मे 2023 –  चेन्नईने मुंबईचा सहा विकेटने पराभव केला. यंदा चेन्नईने मुंबईचा दोन्ही सामन्यात पराभव केला. 

10 मे 2023 – चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव केला. 

14 मे 2023 – कोलकात्याने चेन्नईचा सहा विकेटने पराभव केला. 

20 मे 2023 – चेन्नईने यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा दिल्लीचा पराभव केला. या विजयासह चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.



[ad_2]

Related posts