One Female And One Male Advocates Fighting In Rohini Court By Delhi Viral Video Trending Video Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Fight in Rohini Court Delhi :  सोशल मीडियावर दिल्लीतील रोहिणी कोर्टाच्या परिसरात दोन वकिलांमध्ये जोरदार भांडण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला वकील आणि एक पुरूष वकील  एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारत असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही वकिलांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. हा व्हायरल होणार व्हिडीओ दिल्लीच्या रोहिणी कोर्टाच्या परिसरातील (Fight in Rohini Court Delhi) आहे. 

या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, महिला वकिलाने  पुरूष वकिलाच्या विरोधात पोलिस उपायुक्तांकडे एक औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महिला वकिलाने पुरूष वकिलावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या व्हायरल व्हिडीओतील मारामारी करणाऱ्या पुरूष वकिलाचे  नाव विष्णू कुमार शर्मा असल्याचं सांगितलं जात आहेत. महिला  वकिलाने विष्णू कुमार यांच्यावर छळ करणे, शारीरिक हिंसा आणि धमकावणे अशा प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. ही घटना गुरूवार, 18 मे रोजीची आहे.



महिला वकिलाचं काय म्हणणं आहे ? 

दरम्यान पीडित महिला वकिलाने सांगितले की, ‘त्याने माझ्या अंगाला घट्ट पकडले होते. त्यामुळे मी स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न केला. या दरम्यान वकील शर्माकडून मला सतत मारहाण करण्यात आली. यामुळे माझ्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर अनेक जखमा झाल्या आहेत.’ या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची  पोलिसांनी दखल घेतली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. या प्रकारचा हा पहिला व्हिडीओ नसून याआधीही कोर्टाच्या परिसरातील असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हायरल व्हिडीओला अनेक लोकांनी पाहिल आहे.हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. 

रोहिणी कोर्ट नंबर 113  च्या समोर पीडित महिला वकील उभी राहिली होती तेव्हा विष्णू कुमार शर्माने अचानक येऊन महिला वकिलाला मारहाण करायला सुरूवात केली. यावर महिला वकिलाने सांगितले की, त्या न्यायासाठी कायद्याचा दरवाजा ठोठावणार आहेत. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर घटनेच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू आहे.  

ही बातमी वाचा 

Viral Video : बापरे बाप! तरूणाने पकडला विषारी साप, व्हिडीओला येत आहेत लाखो हिट्स



[ad_2]

Related posts