Team India Players Icc Ranking 2023 Test, T20 And Odi R Ashwin Rohit Sharama Virat Kohli Marthi News Udpate

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Men’s Test, t20 and odi Player Rankings : आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जारी केली आहे. यामध्ये गोलंदाजीत अश्विन पहिल्या स्थानावर आहे तर फलंदाजीत रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलूमध्ये जाडेजाने बाजी मारली आहे. वनडे, टी 20 आणि कसोटीमध्ये भारतीय खेळाडू कोण कोणते कुठे कुठे आहेत.. हे पाहूयात..

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आघाडीच्या दहा फलंदाजामध्ये रोहित शर्मा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.  751 रेटिंग गुणांसह रोहित शर्मा कसोटीमध्ये दहाव्या स्थानावर आहे. 707 गुणासंह वनडेमध्ये रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली आठव्या स्थानावर आहे.  दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी करण्यात यशस्वी झाला तर क्रमवारीत झेप घेऊ शकतो. गोलंदाजीत अश्विन पहिल्या स्थानावर आहे. तर अष्टपैलू खेळाडूमध्ये रविद्र जाडेजा अव्वल स्थानावर आहे. वनडे गोलंदाजीत मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

रॅकिंगमध्ये भारतीय संघ कुठे ?

टी20 क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्तानावर आहे. भारताचे 267 रेटिंग गुण आहेत. वनडेमध्ये भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर कसोटीत भारत अव्वल स्थानावर आहे. वनडेमध्ये भारतीय संघाचे 118 गुण आहेत तर कसोटीत भारताकडे 121 गुण आहेत. 

वनडेमध्ये भारतीय खेळाडू कुठे ?

 एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजीत शुभमन गिल पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहली आठव्या स्थानावर आहे. रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे. म्हणजे, आघाडीच्या दहा फलंदाजात भारताचे तीन खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर 24, शिखर धवन 37, लोकेश राहुल 41, इशान किशन 60, हार्दिक पांड्या 75 क्रमांकावर आहे. 

गोलंदाजीत मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीप यादव 23,  जसप्रीत बुमराह 27, मोहम्मद शमी 32, शार्दुल ठाकूर 43, युजवेंद्र चहल 44,  हार्दिक पांड्या 78, रविंद्र जाडेजा 80 आणि प्रसिद्ध कृष्णा 96 क्रमांकावर आहेत. 

अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या 12 व्या स्थानावर आहे. 

कसोटीत काय स्थिती ?

कसोटीमध्ये फलंदाजीत रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत 11 आणि विराट कोहली 14 व्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा 29, श्रेयस अय्यर 36, रविंद्र जाडेजा 38, अजिंक्य रहाणे 41,  अक्षर पटेल 47, शुभमन गिल 53 आणि लोकेश राहुल 61 व्या क्रमांकावर आहे. 

गोलंदाजीत आर. अश्विन पहिल्या क्रमांकवर विराजमान आहे. रविंद्र जाडेजाने सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराह दहाव्या स्थानावर आहे. मोहम्मद शमी 20,  अक्षर पटेल 32, उमेश यादव 35, मोहम्मद सिराज 39, कुलदीप यादव 49 आणि शार्दुल ठाकूर 50 व्या क्रमांकावर आहे. 

अष्टपैलू खेळाडूमध्ये भारताचा दबदबा आहे. रविद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर अश्विन दुसऱ्या आणि अक्षर पटेल पाचव्या स्थानाव आहे. 

टी20 मध्ये भारतीय खेळाडू कुठे ?

टी 20 फलंदाजीच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर विराजमान आहे. सूर्याशिवाय इतर एकाही फलंदाजाला अव्वल 10 खेळाडूमध्ये स्थान पटकावता आले नाही. विराट कोहली 14, लोकेश राहुल 31, रोहित शर्मा 33, शुभमन गिल 34, इशान किशन 51आणि हार्दिक पांड्या 56 व्या क्रमांकावर आहे. 

टी 20 मध्ये भारतीय गोलंदाजांनी निराशा केली आहे. आघाडीच्या 10 गोलंदाजामध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. अर्शदीप सिंह 13 व्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर कुमार 19, आर. अश्विन 27, अक्षर पटेल 28, युजवेंद्र चहल 36, हार्दिक पांड्या 44, हर्षल पटेल 60, रवि ब्शिनोई 84 आणि दीपक चाहर 85 व्या क्रमांकवर आहेत. 

अष्टपैलूमध्ये आघाडीच्या 20 खेळाडूमध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे. हार्दिक पांड्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. 

 

[ad_2]

Related posts