Rahul Dravid On Virat Kohli’s Success In International Cricket ; विराट कोहली का यशस्वी क्रिकेटर होऊ शकला, राहुल द्रविड यांनी सांगितली खास गोष्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन : विराट कोहली हा यशस्वी क्रिकेटपटू ठरला आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे तो खेळत असलेला हा ५०० वा सामना. कोहली हा यशस्वी क्रिकेटपटू नेमका का झाला, याबाबतचे रहस्य भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले आहे.‘मेहनतीच्या जोरावर मिळवलेले प्रचंड यश, खेळावरील निष्ठा यामुळेच विराट कोहली यशस्वी झाला. आजही त्याची गणना यशस्वी खेळाडूंमध्ये होते,’ भारताचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड त्यांच्या खास अभ्यासू शैलीत बोलत असतात. निमित्त असते विराट कोहलीच्या ५००व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीचे. गुरुवारी सुरू झालेली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ही विराटच्या कारकिर्दीतील पाचशेवी कसोटी आहे.

सचिन तेंडुलकर, स्वतः राहुल द्रविड आणि एमएस धोनी या भारतीयांनीच याआधी पाचशे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दुर्मिळ पराक्रम केला आहे, ज्यात आता विराटचा समावेश झाला. ‘विराटची आकडेवारीच त्याच्या यशाची ग्वाही देते. तुम्ही विक्रमांच्या नोंदी झालेली पुस्तके उघडून बघा, या गुणी फलंदाजाचे नाव तुम्हाला तिथे नक्कीच दिसेल. भारतातील कित्येक मुलांमुलींसाठी विराट आदर्श आहे; पण आता या घडीला भारतीय संघातील खेळाडूही त्याच्या कामगिरीतून स्फूर्ती घेतात, हे खास आहे’, विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी द्रविड यांनी विराटला ही शाबासकी दिली.

‘विराटचा हा प्रवास बघणे मला कायमच भावले. आम्ही पहिल्यांदा एकत्र खेळलो तेव्हा तो खूपच तरुण होता, किशोरवयीन म्हणा हवे तर… त्याची तयारी, सराव, खेळावरील श्रद्धा, उत्साह हे सगळे लांबून बघताना कौतुक वाटे. एवढ्या वर्षांनंतर विराट आजही हे सगळे त्याच उत्साहात करतो आहे. यशाची भूक कायम आहे, नवे शिकण्याची जिद्ध, जिज्ञासा आहे’, द्रविड नमूद करतात.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

विराटचे क्रिकेटच्या तीनही प्रकारांतील यश म्हणजे त्याने पडद्यामागे राहून गाजावाजा न करता केलेल्या तडजोडी आणि परिश्रमाचे प्रतीक आहे, असे द्रविड यांना वाटते. ‘खरे सांगायचे तर मला माहितीही नव्हते की, हा विराटचा पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना आहे. तो सगळ्यांच्या नकळत स्वतःमधील सुधारणांसाठी झटत राहतो, त्यासाठी खूप मेहनत घेतो. हे सीनियर म्हणून मला खूप ग्रेट वाटत आले आहे. आपली मेहनत कुणीतरी बघावी, त्याचे कौतुक व्हावे, यासाठी तो देखावाही करत नाही. आज प्रशिक्षक म्हणून मला ही खूप मोठी बाब वाटते; कारण विराटची मेहनत तरुणपिढीतील अनेक मनांवर नकळत संस्कार करते आहे, त्यातून ही पिढी स्फूर्ती घेते’, असे द्रविड सांगतात.

[ad_2]

Related posts