Scientific Way To Heal The Car Automatically Know In Detail News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Scientific Way To Heal The Car Automatically : ‘तंत्रज्ञान’ हा शब्द आपण अनेकदा ऐकतो कारण आजच्या युगाला तंत्रज्ञान युग असेही म्हणतात आणि तंत्रज्ञानामुळे आपल्या सर्वांचे जीवन सुखकर झाले आहे, तंत्रज्ञानाचा वापर आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात केला जातो आज तंत्रज्ञान (Technology) खूप पुढे जात आहे. प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी नवीन ऐकायला मिळते आणि ते ऐकून आपण कायमच थक्क राहतो. अनेक वेळा आपण विचार करतो हे कसे शक्य आहेत. तसाच एक अनोखा चमत्कार सध्या विज्ञानाच्या मदतीने करण्यात आला आहे. ज्यात तुमची कर अपघातानंतरही आपोआप नीट होऊ शकते. सध्या केवळ प्लॅटिनम (Platinum) च्या धातुवर याचा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र लवकरच ही टेकनीक (Technique) इतर धातूंकरता वापरली जाणार आहे.

अनेकदा आपण गाडी घेऊन बाहेर पडतो आणि अनावधानाने कधीतरी अपघात होतो.अशा वेळी गाडीचे मोठे नुकसान होते. गाडीचे नुकसान झाल्याने खर्च देखील वाढतो. मात्र भविष्यात तुमच्या गाडीचा अपघात झाला तर तुमची कार परत आहे तशीच नवीकोरी दिसू शकते. हे अगदी जादूसारखे आहे. म्हणजे तुमच्या गाडीचा जो कोणता भाग खराब झाला असेल तो आपोआप ठीक होऊ शकतो. हे कसे होईल ते जाणून घ्या.

हे कसे होईल? (How It Works)

सॅन्डिया नॅशनल लॅबोरेटरी आणि टेक्सास युनिव्हर्सिटीने एक संशोधन केले आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वास्तविक, या दोन्ही संस्थांनी स्पेशलाइज्ड ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (Speclized Transmission Electron Microscope) तंत्रज्ञान वापरून एक तंत्र विकसित केले आहे, ज्याच्या मदतीने एखादा धातू स्वतःला दुरूस्त करेल. ही प्रक्रिया अजूनही मोठ्या प्रमाणात विकसित झालेली नसली तरीही हळूहळू ती गतीमान करण्याचे काम सुरू आहे. 

हे सर्व प्रकारच्या धातूंवर चालेल का?

सध्या हा प्रयोग फक्त प्लॅटिनमवर करण्यात आला आहे. पण या तंत्रज्ञानाच्या मदतीने इतर प्रकारच्या धातूंवरही हा प्रयोग केला जाईल, असा अंदाज आहे. असे झाल्यास, जेव्हा जेव्हा धातूपासून बनविलेले काहीही तुटेल किंवा स्फोट होईल तेव्हा ते स्वतःला दुरूस्त करण्यास सक्षम असेल. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेला विकसीत होण्याकरता बराच कालावधी लागणार आहे. पण जर ते यशस्वी झाले तर ते सर्वात मोठे यश मानले जाईल.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Netflix : नेटफ्लिक्सचा भारतीयांना दणका! आता पासवर्ड शेअरिंग बंद; कंपनीकडून नवीन नियम लागू

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts