Indw Vs Banw India Women And Bangladesh Will Share Odi Trophy 3rd Match Tied Dhaka

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BAN vs IND : भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघातील अखेरचा आणि निर्णायक सामना बरोबरीत सुटला आहे. तीन वनडे सामन्याची मालिका एक एक  बरोबरीत सुटली आहे. बांगलादेशने दिलेल्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २२५ धावांपर्यंत मजल मारु शकला. अखेरच्या चेंडूपर्यत रंगलेला सामना बरोबरीत सुटला. पहिला वनडे सामना बांगलादेशने जिंकला होता तर दुसरा सामना भारताने जिंकून मालिका रंगतदार केली होती. अखेरच्या वनडे सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण सामना बरोबरीत सुटला. भारताकडून स्मृती मांधना हिने शर्थीचे प्रयत्न केले, पण भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले. 

बांगलादेश महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात चार विकेटच्या मोबदल्यात २२५ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून फार्गुना हाक हिने शतकी खेळी केली. तिने १६० चेंडूचा सामना करताना सात चौकाराच्या मदतीने १०७ धावांची खेळी केली. त्याशुवा सुल्ताना हिने ७८ चेंडूत पाच चौकाराच्या मदतीने ५२ धावांचे योगदान दिले. त्याशिवा कर्णदार निगर सुल्ताना हिने २४ धावा जोडल्या. शोबना हिने २२ चेंडूत २३ धावांचे योगदान दिलेय. भारताकडून स्नेह राणा हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर देविका वैदय हिला एक विकेट मिळाली. 

बांगलादेश महिला संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. शेफाली वर्मा आणि यात्सिका भाटिया स्वस्तात तंबूत परतल्या. शेफाली वर्मा हिला चार तर यात्सिकाला पाच धावा करता आल्या. हरलीन देओल आणि स्मृती मांधना यांनी भारताचा डाव सावरला. स्मृतीने ५९ धावांची दमदार खेळी केली. यामध्ये पाच चौकार लगावले. तर हरलीन देओल हिने ९ चौकाराच्या मदतीने ७७ धावांची दमदार खेळी केली. त्याशिवा जेमिमा रॉड्रिग्स हिने ३३ धावांच योगदान दिले.. कर्णधार हरमनप्रीत कौर फक्त १४ धावांचे योगदान देऊ शकली. स्मृती आणि हरलीनचा अपावाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. जेमिमाने प्रयत्न केले पण ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. जेमिमा ३३ धावांवर नाबाद राहिली. दिप्ती शर्मा स्नेह राणा अमनज्योत कौर आणि देविका वैदय स्वस्तात तंबूत परतल्या. बांगलादेशकडून नाहिदा अख्तर हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर मुर्फा अख्तर हिने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. 



[ad_2]

Related posts