RR Ipl Playoff Scenario Rr Hopes For Mi And Rcb To Lose So Rajasthan Cal Qualify Ipl 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023 Playoff Scenario : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या यंदाच्या सोळाव्या हंगामाला 31 मार्चला सुरुवात झाला. आयपीएल 2023 (Indian Premier League) मधील 68 सामने खेळवण्यात आले असून शेवटचे दोन साखळी सामने शिल्लक राहिले आहेत. तीन संघांनी प्ले ऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) प्रवेश मिळवला आहे. एक प्लेऑफमधील (IPL Playoffs Race) एका रिक्त जागेसाठी तीन संघांमध्ये आज लढत आहेत.

राजस्थान संघाची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा कायम 

गतविजेत्या गुजरात टायटन्स (GT), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या तीन संघांनी स्थान निश्चित केलं आहे. टॉप 4 मधील शेवटच्या क्रमांकासाठी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात शर्यत आहे. मुंबई आणि बंगळुरूला त्यांचे आजचे शेवटचे साखळी सामने जिंकून प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवण्याची संधी आहे. राजस्थान संघालाही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची धुसर संधी आहे. राजस्थान संघ बंगळुरू आणि मुंबईच्या निकालांवर अवलंबून आहे, कारण संघाने आपले सर्व साखळी सामने खेळले आहेत. त्यामुळे राजस्थान मुंबई आणि बंगळुरु संघाच्या पराभवासाठी प्रार्थना करेल.

राजस्थान संघ बंगळुरू आणि मुंबईच्या निकालांवर अवलंबून

आज यंदाच्या आयपीएलमधील शेवटचे डबल हेडर सामने रंगणार आहेत. पहिल्या सामन्यात मुंबई आणि हैदराबाद आमनेसामने असतील, तर दुसऱ्या सामन्यात बेंगळुरूचा सामना गुजरातशी होईल. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांकडेही प्रत्येकी 14 गुण आहेत. पण दोन्ही संघांचे प्रत्येकी एक-एक सामने शिल्लक आहेत. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

मुंबई आणि बंगळुरुच्या पराभवासाठी राजस्थानची प्रार्थना

राजस्थान रॉयल्स (RR) संघाने पंजाब किंग्स (PBKS) विरोधात विजय मिळवला असला तरी, राजस्थान रॉयल्स संघाचा प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नाही. आता राजस्थान रॉयल्स (RR) संघाचं भविष्य मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या हातात आहे. राजस्थान (RR) संघ आता प्रार्थना करेल की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स (MI) संघ त्यांचे आगामी सामने मोठ्या फरकाने हरावेत. तरच राजस्थानला पुढे जाण्याची संधी मिळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सने आपापले सामने जिंकल्यास राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts