Rain Hits Bengaluru Dark Clouds And Rain Have Begun To Hover Around The City IPL 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Heavy Rain in Bengaluru, GT vs RCB : मुंबईच्या मदतीला पाऊस धाऊन आल्याचे चित्र झालेय. बेंगलोरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. बेंगलोरमध्ये आरसीबी आणि गुजरात यांच्यात साखळी फेरीतील अखेरचा सामना होत आहे. त्या सामन्यापूर्वीच बंगलोरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारीही बेंगलोरमध्ये पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे खेळाडूंना सराव करता आला नव्हता. आजही सकाळपासून बेंगलोरमध्ये धो धो पाऊस कोसळतोय. सोशल मीडियावर बेंगलोरमधील पावसाचे अपडेट नेटकरी देत आहेत. आकाश चोप्रा यांनीही बेंगलोरमधील पावसाचा व्हिडीओ पोस्ट केलेया. 

बंगलोरमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामना होणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

RCB vs GT, Bengaluru hourly weather today

⦿ 5:00 PM IST – 51 टक्के पावसाची शक्यता.. 

⦿ 6:00 PM IST –  43 टक्के पावसाची शक्यता 

⦿ 7:00 PM IST – पावसाची शक्यता 65 टक्के

⦿ 8:00 PM IST – 49 टक्के पावसाची शक्यता

⦿ 9:00 PM IST – 65 टक्के पावसाची शक्यता

⦿ 10:00 PM IST –  40 टक्के पावाची शक्यता

सोशल मीडियावर बेंगलोर, चिन्नास्वामी स्टेडिअम, आरसीबी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.  

 

बंगळुरु संघासाठी प्लेऑफचं समीकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी प्लेऑफच्या समीकरण जाणून घ्या. सध्या 13 सामन्यांतून सात विजयांसह आरसीबी संघाकडे 14 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर संघाला त्यांचा गुजरात विरोधातील शेवटचा साखळी सामना जिंकून 16 गुण मिळवावे लागतील. शिवाय, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव व्हावा किंवा मुंबईला कमी फरकाने विजय मिळावा, अशी इच्छा बाळगावी लागेल. यामुळे स्थितीत आरसीबीला 16 गुण मिळतील आणि त्याचा नेट रन रेटही मुंबईपेक्षा चांगला असेल. असे झाल्यास आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळेल. पण सध्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना

आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील शेवटचा 70 वा लीग सामना आज बंगळुरु आणि गुजरात (GT vs RCB) या दोन संघात रंगणार आहे. 21 मे रोजी बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरात संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबी संघाला आजचा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. 



[ad_2]

Related posts