India vs West Indies Live Streaming For Free ; भारत आणि वेस्ट इंडिजमधील वनडे मालिका Live फ्रीमध्ये कुठे पाहू शकता, जाणून घ्या योग्य चॅनेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ब्रिजटाऊन : भारत आणि वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिका संपली. आता वनडे मालिकेला आता गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. पण ही वनडे मालिका नेमकी कुठे लाइव्ह पाहता येईल आणि कुठल्या चॅनेलवर ही मालिका फ्री पाहायला मिळू शकते, याची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आता तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा २७ जुलैला ब्रिजटाऊन येथे होणार आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना हा शनिवारी २९ जुलैला ब्रिजटाऊन येथे होणार आहे. या वनडे मालिकेतील तिसरा आणि सामना हा मंगळवारी १ ऑगस्टला तारोऊबा या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

तुम्ही लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग Ind vs WI Live Streaming फॅनकोड अॅपवर असेल. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजने चाहत्यांसाठी जिओ सिनेमावर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंगही आणले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोठे पाहू शकता?
भारत आणि वेस्ट इंडिज भारत विरुद्ध WI यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर होईल. यासाठी दर्शकांना कोणत्याही DTH रिचार्जची गरज भासणार नाही.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका चांगलीच रंगली होती. पहिल्या कसोटीत जरी भारताने मोठा विजय साकारला असला तरी दुसऱ्या कसोटीत मात्र वेस्ट इंडिजने त्यांना चांगलेच झुंजवले. हा सामना अखेरच्या आणि पाचव्या दिवसापर्यंत गेला होता. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवेल, असे वाटत होते. पण पावसाने सगळा घोळ केला. पाचव्या दिवशी पावसामुळे एकही षटकाचा खेळ होऊ शकला नाही आणि त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. पण भारताने ही मालिका १-० अशी जिंकली होती. आता वनडे मालिकेत कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts