8 Fruits to Relive Constipation or Piles Immediately Naturally at Home; बद्धकोष्ठता मूळव्याध फिगर आतड्यांचा कर्करोग या आजारांपासून वाचण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी खा फायबरने समृद्ध ही ८ फळे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

केळी

केळी

फायबरने समृद्ध असणाऱ्या केळीचा उपयोग बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय म्हणून केला जातो. पिकलेली केळी खाल्ल्याने बाउल सिंड्रोम सुधारतो आणि लहान आतड्यात असलेल्या मायक्रोव्हिलीला योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत मिळते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
(वाचा :- Longer Life Secret: दुपारी केलेली ही 5 कामे देतात 100 वर्षापर्यंत दीर्घ व ठणठणीत आयुष्य, सायंटिस्टची सोपी ट्रिक)​

संत्री

संत्री

संत्री हे फायबर आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. संत्र्यांमध्ये रेचक प्रभाव असल्याचे जाणकार म्हणतात. बद्धकोष्ठतेमध्ये संत्री संपूर्ण खावीत कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. संत्र्यामध्ये नारिंजेनिन (फ्लॅव्होनॉइड) हे संयुग असते, जे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

(वाचा :- पचनशक्ती वाढवतात Ayurveda चे हे 3 साधे नियम, डॉक्टर म्हणाले जे लोक फॉलो करतील त्यांचं आतडं दगड सुद्धा सहज पचवेल)​

कीवी

कीवी

किवी हे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले फळ आहे आणि त्यामुळेच बद्धकोष्ठतेसाठी हे सर्वोत्तम फळ आहे. याशिवाय त्यात भरपूर फायबर आणि पाणी असते, जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आवश्यक असते. ऍक्टिनिडिन, हे किवीमध्ये आढळणारे एन्झाइम, बद्धकोष्ठता दूर करण्यास देखील मदत करते.
(वाचा :- ना डाएटिंग-ना एक्सरसाईज, पाण्यात मिसळून प्या हे घरगुती चूर्ण, लोण्यासारखी झर्रकन वितळेल पोट व मांड्यांची चरबी)​

नाशपती

नाशपती

नाशपातीमध्ये केवळ फायबरच नाही तर फ्रक्टोज आणि सॉर्बिटॉल सारखे घटक देखील आढळतात. याचा रेचक प्रभाव असतो आणि म्हणूनच पोटाच्या समस्यांसाठी हे एक उत्तम फळ मानले जाते. सॉर्बिटॉल हे मल मऊ करण्याचे कार्य करते.
(वाचा :- Insulin Resistance : शरीराच्या कोणत्याही भागात हे लक्षण दिसलं तर लगेच डॉक्टरकडे जा, समजून जा खूप वाढलं इन्सुलिन)​

सफरचंद

सफरचंद

सफरचंद हे असे एक फळ आहे जे बद्धकोष्ठता तसेच अतिसारापासून आराम देण्यास मदत करते. सफरचंद सालीसह खाण्याचा सल्ला दिला जातो. सालीमध्ये न विरघळणारे फायबर असते आणि त्यामुळे आतड्याचे कार्य सुरळीत होते. सफरचंदामध्ये विरघळणारे फायबर देखील असते, विशेषत: पेक्टिन नावाचे फायबर, जो बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी काम करते.
(वाचा :- AI Robot पेक्षा गतीमान बनेल मेंदू, करा ही 6 कामं, स्मरणशक्ती व बुद्धी होईल घोड्याहून तेज, मिळेल सर्व कामांत यश)​

पपई

पपई

पपई हे फायबर युक्त आणि कमी कॅलरी असलेले फळ आहे. त्यात पाण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे आतड्याचे कार्य चांगले राहते. त्यात पॅपेन नावाचे एंजाइम असते, जे पचन सुधारते. पपई नेहमी चिया किंवा अंबाडीच्या बियांसोबत खा. याशिवाय अंजीर आणि सुका मनुका ही फळे देखील बद्धकोष्ठतेमध्ये आराम देतात.
(वाचा :- पावसाळ्यात गरमागरम चहा पिण्याची वेगळीच मज्जा, पण अजिबात करू नका या 5 चुका, पोटात अ‍ॅसिड बनून आतड्यांना बसेल पीळ)​

[ad_2]

Related posts