[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार या दौऱ्यात भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात कमबॅक करू शकतो आणि त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आयर्लंड दौऱ्यात भारत १८,२० आणि २३ ऑगस्ट रोजी टी-३० मॅच खेळणार आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघासाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि आशिया कपसाठी निवडण्यात आलेले सर्व खेळाडू भाग सहभागी असतील. अपवाद फक्त जसप्रीत बुमराहचा असेल. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला बुमराहला टी-२० सामन्यात खेळवायचे आहे. आयर्लंड दौऱ्यात बुमराह १० महिन्याच्या दुखापतीच्या ब्रेकनंतर संघात परतणार आहे. या काळात त्याच्यावर एक शस्त्रक्रिया देखील झाली होती.
आशिया कपच्या तयारीसाठी बेंगळुरूत एक आठवड्याचे शिबिर आयोजित करण्यात यावे असा सल्ला द्रविड यांनी दिला होता. या शिबिराची सुरुवात २४ किंवा २५ ऑगस्टला सुरू होऊ शकते. आशिया कपची सुरूवात ३० ऑगस्टला होणार आहे आणि भारताची पहिली लढत २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. खेळाडूंसोबतच आयर्लंड दौऱ्यात द्रविड आणि सपोर्ट स्टाफला देखील विश्रांती दिली जाऊ शकते.
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजमध्ये असून २७ आणि २९ जुलै रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन वनडे मॅच होणार आहेत. तर ५ सामन्यांची टी-२० मालिका ३ ते १३ ऑगस्ट दरम्यान होईल. वनडे मालिकेसाठी हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाले आहेत. तर यशस्वी जयस्वाल वगळता आर अश्विन, अजिंक्य रहाणे आणि नवदीप सैनी भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत.
[ad_2]