Delhi Court News coal scam case Vijay Darda and Devendra Darda Sentenced to four years imprisonment news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पूत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  सीबीआयच्या विशेष कोर्टाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह सात जणांना शिक्षा सुनावली आहे. 13 जुलै रोजी विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा (Devendra Darda), कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच सी गुप्ता आणि यवतमाळचे उद्योगपती मनोज जयस्वाल यांना दोषी ठरवलं होतं. छत्तीसगडमधील कोळसा खाणींच्या वितरणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका कोर्टानं सर्वांवर ठेवला होता.  न्यायालयाने IPC कलम  120B, 420 आणि भ्रष्टाचाराशी संबंधित कलमं या सर्वांवर लावली होती.

दर्डंबरोबरच मनोज जयस्वाल यांनाही चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर  एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

काही आरोपी तुरुंगात
छत्तीसगडमधल्या कोळसा घोटळा प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या घोटाळ्यात राजकाणाशी संबंधीत असलेल्यांपासून नोकरदारवर्गापर्यंत अनेक जण रायपूर तुरुंगात बंद आहेत. यात आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, मुख्यमंत्र्यांचे उप सचिव सौम्या चौरसिया, कोळसा घोटाळ्यात सिंडीकेटची भूमिका बजावणारा सूर्यकांत तिवारी, सुनीर अग्रवाल यांचा समावेश आहे. 

घोटाळ्यात अनेक जणांचे हात
या प्रकरणी काही जणांचा इडीकडून तपास केला जात आहे. यात माजी कलेक्टर आयएएस रानू साहू यांचा समावेश आहे. आगामी काळात याप्रकरणात काही बड्या लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय.या प्रकरणात ईडीने आतापर्यंत रानू साहू, सूर्यकांत तिवारी, आमदार देवेंद्र यादव, आमदार चंद्रदेव प्रसाद राय, आरपी सिंह, विनोद तिवारी आणि राम गोपाल अग्रवाल यांची संपत्ती, अलीशान गाड्या, दागिने आणि 51.40 कोटी रोख रक्कम जप्त केली आहे. 

Related posts