Maharashtra Monsoon Session Deputy Chairperson Of Maharashtra Legislative Council Neelam Gorhe Take Action Against Bjp Mlc Gopichand Padalkar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Monsoon Session :  आपल्या आक्रमक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यात खडाजंगी झाली. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर गोपीचंद पडळकर भाषण करत होते. त्यावेळी सभापती नीलम गोऱ्हे यांनी भाषण आवरते घेण्याची सूचना केली. मात्र, सभापतींच्या सूचनेवर पडळकर यांनी नाराजी व्यक्त करत काही वक्तव्य केले. त्यावरून सभागृहातील वातावरण काहीसे तंग झाले. अखेर मंत्री दीपक केसरकर यांनी झाल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त केली. पडळकर यांना गुरुवारी सभागृहात बोलण्यास मनाई करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सरकारचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी विविध निर्णयांचा उल्लेख केला. भाषणाला 13 मिनिटे झाल्यानंतर सभापतींनी त्यांना भाषण आवरते घेण्यास सांगितले. मात्र, पडळकर यांनी नाराजी व्यक्त सभापतींची सूचना अमान्य असल्याचे दर्शवले.  त्यानंतर पडळकर सभापतींना उद्देशून काही वर्तन, भाष्य केले. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापतींच्या खुर्चीचा सन्मान राखला जावा आणि दिलगिरी व्यक्त करावी अशी सूचना पडळकर यांना केली. पडळकर यांनी भाषण संपवल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी देखील पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. 

>> निलम गोऱ्हे आणि गोपीचंद पडळकर यांच्यात खडाजंगी

निलम गोऱ्हे: चला आवरते घ्या 13मिनिटे झाली तुमची  

गोपीचंद पडळकर:  तुम्ही गणित बिघडवून देता … इतरांना इतका वेळ देता … उगाच वाद घालता परत … 

निलम गोऱ्हे: धस साहेब किती बोलायचा द्यायचे…साडे आठ झालेत मर्यादा ठेवा … सभागृहास वेठीस धरु नका…

गोपीचंद पडळकर: मी वेठीस धरत नाही कशाची मर्यादा आहे तुम्ही नियोजन नीट ठेवा ना…एकाला एक एक तास दीड तास देताय एकाला 25 मिनिटे आणि आम्ही बोलायला लागलो की बेल वाजवताय.. 

निलम गोऱ्हे: असं तुम्ही करु शकत नाही ब-यांच दा तुम्ही असं करता … तुम्हाला ताकीद मिळाली आहे…

गोपीचंद पडळकर: काय ताकीद देताय … निषेध करतो मी ( तुमचा असं करत गोपीचंद पडळकर यांनी हातातले पेपर फाडले ) 

निलम गोऱ्हे: धमक्या देवू नका इथे … काय चाललंय तुमचं … तुम्ही अत्यंत चुकीचे वर्तन केले आहे… तुम्ही इतरांची तुलना करता… 

अंबादास दानवे: गोपीचंद पडळकर असं नका करु चेअरचा मान राखा 

निलम गोऱ्हे: मी पण हेच बोलले २ मिनिटात संपवा … ताशेरे मारताय असं तसं नाहीये 

गोपीचंद पडळकर: एक आठ दहा विषय आहेत ते मांडतो मी… ( विषय मांडले नंतर निलम गोऱ्हे बोलले ) 

सचिन अहिर: तुम्ही बोलला ते संसदीय कार्य पद्धतीला धरुन नाहीये…सभापती महोदय हे रेकॅार्डवर राहिले पाहिजे नाही आणि सदस्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे… प्रश्न तो व्यक्तींचा नाही चेअरचा नाही … पण तुम्ही असं जर बोलत असाल … आमच्या बाबतीत पण होत असं पण हे असं बोलतो पेपर फाडतो हे असं सभागृहात चालणार नाही … 

निलम गोऱ्हे: आता हे पहा मला असं वाटतं की तुम्ही माझा निषेध केलाय ते मी सभागृह कामकाजातून काढून टाकतेये…आणि तुम्ही जे वर्तन केलेले आहे त्यामुळे उद्या तुम्हाला दिवसभर सभागृहात बोलू देणार नाही… तुम्हाला हे मान्य करावं लागेल हा माझा निर्णय आहे तुम्ही फक्त माझा अपमान नाही तर चेअरचा अपमान केलाय… सभागृहाचा अपमान आहे त्याची तुम्हाला जाणीव नाहीये … नाही तर तुम्हाला मार्शलला बोलावून बाहेर काढावे लागेल …

राजेश दराडे: पडळकरांनी जे वाक्य वापरले ते फार चुकीचे आहे त्यांनी दबावाचे काम केले ते चुकीचे आहे

सचिन अहिर: मला बाकीचे काही नाही दोन्ही मंत्री सभागृहात बसलेत पण त्यांनी कोणी गोपीचंद पडळकर यांना बोलायला पाहिजे… माझी विनंती आहे की आपण देखील सरकारच्यावतीने आपण बोललं पाहिजे 

दीपक केसरकर: झालेल्या घटने बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो … आणि त्यांना आवश्यक त्या सुचना या वरिष्ठांकडून देण्यात येतील असं आपल्याला आश्वासित करतो … 

गोपीचंद पडळकर: मी काही चुकीचे बोललो नाही तरी देखील मी चेअरचा मान राखून दिलगिरी व्यक्त करतो

पाहा व्हिडीओ: Gopichand Padalkar Vs Neelam Gorhe : उद्या बोलू देणार नाही, पडळकरांवर नीलम गोऱ्हेंची कारवाई

[ad_2]

Related posts