[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पहिल्या वनडे सामन्यात जे्हा भारतीय संघाची निवड झाली तेव्हा सर्वांनाच सूर्याचे नाव ऐकल्यावर धक्का बसला. कारण संघात बरेच चांगली खेळाडू रांगेत असताना त्याला थेट संधी देण्यात आली होती. याबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्मावर टीकाही झाली. त्यानंतर सूर्या हा मैदानात उतरला. यावेळी सूर्याने संजूची जर्सी घातल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी काही जणांनी, ‘ संजूची जागा हिरावली आणि आता त्याचे टी शर्टही घेतले’ अशी टीका केली होती. पण सूर्याने संजूचीच जर्सी यावेळी का घातली, याचे कारण आता समोर आले आहे.
बीसीसीआयने यावेळी एक मोठा घोळ घातला. कारण यावेळी पहिला वनडे सामना सुरु होण्यापूर्वीही सूर्याला त्याची जर्सी मिळाली नाही. सूर्याला लार्ज साईजची जर्सी हवी होती, पण त्याला मिडीयम साइजची जर्सी देण्यात आली होती. ही मिडीयम साइजची जर्सी घालून तो मैदानात उतरू शकत नव्हता. जेव्हा भारतीय संघाचे वनडे सामन्यापूर्वी फोटो शूट केले तेव्हाही सूर्याकडे त्याची जर्सी नव्हती. पण त्यावेळी सूर्याने वेळ मारून नेली होती. पण आता सामना खेळायचा कसा, हा मोठा प्रश्न सूर्यापुढे होता. रोहित शर्माने संघ जाहीर केला, त्यावेळी सूर्याचे नाव त्यामध्ये होते. पण त्याचवेळी संजूला मात्र यावेळी संघात स्थान देण्यात आले नव्हते. सूर्या आणि संजूच्या जर्सीची साइज जवळपास सारखीच आहे. त्यामुळे त्याने यावेळी संजूला आपली जर्सी देण्याची विनंती केली. संजूने सूर्याची विनंती मान्य केली आणि त्याला आपली जर्सी दिली. त्यामुळे संजूची जर्सी घालून सूर्या खेळत असल्याचे पहिल्या सामन्यात पाहायला मिळाले.
संजूच्या जर्सीत सूर्या दिसला आणि चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली. पण खरं कारण मात्र काही वेगळंच असल्याचे पाहायला मिळाले.
[ad_2]