Surya Gochar will confidence of this zodiac will increase along with financial gains

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sun Transit Leo 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देव दर महिन्याला त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. सूर्य देव सध्या कर्क राशीत बसले आहेत. 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य तब्बल एका वर्षानंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान सूर्याचं हे गोचर ( Surya Gochar 2023 ) काही राशींसाठी भरपूर लाभदायक ठरणार आहे.

सूर्याच्या या गोचरमुळे काही राशींच्या लोकाना धनप्राप्तीसोबतच मान-सन्मान देखील मिळणार आहे. 17 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना सूर्याच्या गोचरमुळे फायदा होणार आहे.

मिथुन रास

या राशीमध्ये सूर्य तिसऱ्या भावात असल्याने या राशीच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळू शकणार आहेत. या काळामध्ये नोकरदार लोकांच्या कामाचं कौतुक होणार आहे. तुम्हाला यावेळी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब किंवा मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता. बरेच दिवस थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकते. 

कर्क रास

या राशीमध्ये सूर्याचा दुसऱ्या घरात प्रवेश होत असल्याने या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबाचा सहवास चांगला राहणार आहे. नोकरदार लोकांच्या जीवनात अनेक आनंद येऊ शकतात. कार्यक्षेत्रात तुम्ही खूप प्रगती कराल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे त्यामुळे अशा परिस्थितीत या राशीच्या राशीच्या लोकांचं आरोग्य आणि आत्मविश्वास चांगला राहणार आहे. अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात, ज्या पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. इतरांना मदत करून तुम्ही सर्वांची मने जिंकू शकता.

तूळ रास 

तूळ राशीच्या अकराव्या घरात सूर्य प्रवेश करणार आहे. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभासोबतच व्यवसायात प्रचंड यश मिळेल. कुटुंब आणि मुलांसोबत चांगला वेळ जाईल. समाजात मान-सन्मान वाढेल. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts