Money Arrogance Ego Kapil Dev Blasts India Stars; कपिल देव टीम इंडियावर संतापले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार असलेल्या कपिल देव यांनी सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंची चांगलीच कानउघाडणी केली आहे. भारतीय खेळाडूंच्या आत्मविश्वासाचं त्यांनी कौतुक केलं. मात्र भारतीय खेळाडूंचे अवगुण त्यांनी स्पष्टपणे मांडले. आत्मविश्वास असणं ही जमेची बाजू आहे. पण आपल्याला सगळं येतं. आपण सर्वज्ञ आहोत, असं वाटू लागणं योग्य नाही. तुम्ही आत्मविश्वासू असता हे ठीक आहे. पण तुम्हाला कोणाला काहीच विचारायची गरज वाटत नाही. अनुभवी खेळाडूंकडून सल्ला घ्यावासा वाटत नाही, हे कही बरं नव्हे, अशा शब्दांत देव यांनी भारतीय संघातील खेळाडूंना सुनावलं.

कपिल देव यांनी ‘द वीक’शी संवाद साधला. त्यात ते भारतीय संघाबद्दल बरंच बोलले. ‘भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. ही गोष्ट खूप चांगली आहे. पण आपल्याला सगळं कळतं अशी समजूत असणं ही नकारात्मक बाब आहे. आपण सर्वज्ञ आहोत, असं वाटू लागल्यानं आपल्याला कोणाला काही विचारायची गरज नाही या भ्रमात ते वावरत आहेत. एक अनुभवी व्यक्ती नेहमी तुम्हाला मदत करू शकतो , असं मला वाटतं,’ असं देव म्हणाले.

पैसे आल्यावर अहंकारदेखील येतो. काही खेळाडू असेही आहेत की त्यांच्यातला अहंकार त्यांचा सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूकडून सल्ला घेण्याच्या आड येतो. बऱ्याचदा असं होतं. पैसा हाती येतो. मग त्यासोबत अहंकारदेखील येतो. मग क्रिकेटपटूंना आपल्याला सगळं काही येतं असं वाटू लागतं. अनेक क्रिकेटपटूंना मदतीची गरज आहे. सुनिल गावसकर तिथे आहेत. तुम्ही त्यांच्याशी का बोलत नाहीत?, असा प्रश्न देव यांनी उपस्थित केला.

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी काही दिवसांपूर्वीच सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंवर भाष्य केलं होतं. भारतीय क्रिकेटपटू क्वचितच आपल्याकडून सल्ला घेण्यास येतात, असं गावसकर म्हणाले होते. ‘राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हिव्हीएस लक्ष्मण माझ्याकडे नेहमी यायचे. त्यांच्या काही समस्या घेऊन ते यायचे. माझी काही निरीक्षणं त्याबद्दल असायची. त्याबद्दल मी त्यांच्याशी मोकळेपणानं बोलायचो,’ असं गावसकरांनी म्हटलं होतं.

[ad_2]

Related posts