Shrikant Jichkar Indias most educated Marathi leader educated from 42 universities doctor lawyer IAS IPS and many more;भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Srikant Jichkar: एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो? किती विद्यापिठात शिकू शकतो? यावर आपलं उत्तर 1 ते 10 आकड्यापर्यंत असू शकते. पण असा मराठी माणूस आहे, जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, जिचकार यांनी देशातील सर्वात शिकलेला व्यक्ती होण्याचा मान कायम ठेवला आहे. जिचकार यांनी त्यांच्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकच मिळवला आहे. एवढेच नव्हे तर अनेक सुवर्णपदकेही जिंकली आहेत.

श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले. तसेच पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी चार महिन्यांनी आपले पददेखील सोडले.1980 मध्ये श्रीकांत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाऊल टाकले. ज्यामुळे ते देशातील सर्वात तरुण खासदार बनले. त्यांनी राज्यमंत्री, राज्यसभा सदस्य आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य अशी पदेही भूषवली आहेत. 

श्रीकांत यांचे व्यक्तीमत्व सर्जनशील होते. त्यांना चित्रकला, फोटोग्राफी आणि नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती. धर्म, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर भाषणे देण्यासाठी ते देशभर फिरले. त्याचवेळी त्यांनी युनेस्कोमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले होते. 

पण नियतीच्या मनात काही वेगळेच सुरु होते. 2 जून 2004 ही त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. या दिवशी श्रीकांत हे त्यांच्या मित्राच्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या कारला एका बसने धडक दिली. या अपघातात डॉ. जिचकर यांचे वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी निधन झाले.

श्रीकांत हे आपले आयुष्य मनमुरादपणे जगले. सर्वच श्रेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. डॉक्टर, वकील, आयपीएस आणि आयएएस अधिकारी आणि राजकार अशा विविध ठिकाणी त्यांनी विहार केला. तुलनेने तरुण असूनही पूर्ण आयुष्य जगले. जिचकर यांचा 52,000 तुकड्यांचा मोठा संग्रह त्यांनी त्यांच्या वैयक्तिक लायब्ररीत ठेवला आहे, जो त्यांच्या शिकण्याच्या आवडीचा आणखी एक पुरावा आहे.

श्रीकांत जिचकर यांच्या पदव्या

1. वैद्यकीय डॉक्टर, MBBS आणि MD
2. लॉ, LL.B.
3. आंतरराष्ट्रीय कायदा, LL.M.
4. व्यवसाय प्रशासन, DBM आणि MBA मध्ये मास्टर्स
5. पत्रकारितेतील पदवीधर
6. एमए सार्वजनिक प्रशासन
7. एमए समाजशास्त्र
8. एमए अर्थशास्त्र
9. एमए संस्कृत
10. एमए इतिहास
11. एमए इंग्रजी साहित्य
12.एमए तत्वज्ञान
13.एमए राज्यशास्त्र
14. एमए प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व
15. एमए मानसशास्त्र
16. डी.लिट. संस्कृत – विद्यापीठातील सर्वोच्च पदवी
17.IPS
18.IAS

Related posts