Shiv Sena MLA Disqualification Case Final Result By Maharashtra Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar Verdict Ramesh Korgaonkar Bhandup West MLA Qualification Disqualification Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Shivsena MLA Political Crisis Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MLA Disqualification Case : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे. संपूर्ण राज्याचं या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून आमदारांचीच नाहीतर संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली आहे. नार्वेकर यांच्या निकालाकडे रमेश कोरगावकर (Ramesh Korgaonkar) यांचेही लक्ष लागले आहे. कारण, ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या यादीत रमेश कोरगावकर यांचे देखील नाव आहे. आता रमेश कोरगावकर हे पात्र की अपात्र ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जाणून घेऊयात रमेश कोरगावकर यांच्याबद्दल…

रमेश कोरगावकर यांचा राजकीय परिचय – 

रमेश कोरगावकर हे भांडूप पश्चिप विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. कार्यकर्ता, नगरसेवक आणि आमदार असा प्रवास त्यांचा राजकीय प्रवास आहे. रमेश कोरगावकर हे 2002 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये  (BMC)  नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये आणि 2012 मध्ये देखील ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 2012 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नागरी बांधकाम (उपनगरे) समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. 2019 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले.

पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंना समर्थन देण्याचा निर्णय घेतला

पक्ष फुटीनंतर रमेश कोरगावकर यांना उद्धव ठाकरेंना समर्थन दिले. सुनील प्रभूंच्या व्हिपचं रमेश कोरगावकर यांनी पालन केलं. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहोत, अशी भूमिका रमेश कोरगावकर यांनी घेतली.  

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला.  जवळपास दोन वर्षानंतर राज्यातील हे महाविकासआघाडीचं सरकार कोसळलं. त्याला एकनाथ शिंदेंचा बंड हे कारण ठरले. एकनाथ शिंदे यांनी महाविकासआघाडीच्या विरोधात बंड पुकारलं. ते काही आमदारांना घेऊन सूरतमार्गे गुवाहाटीमध्ये पोहचले. एकाचवेळी 40 आमदारांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेयांच्यासह 16 आमदारांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे असे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरेंच्या बाजूच्या 14 आणि एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर पडदा उठणार आहे. यामधील ठाकरे गटाच्या  14 आमदारांच्या यादीत रमेश कोरगावकर यांचे देखील नाव आहे. आता रमेश कोरगावकर यांची आमदारकी पात्र ठरणार की अपात्र ठरणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा :

MLA Disqualification Case : वैभव नाईक पात्र की अपात्र? राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष

 

 

[ad_2]

Related posts