ISRO Successfully Launched 7 Planets Of Singapore From Shriharikotta Andra Pradesh Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ISRO New Space Mission : अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी (30 जुलै) एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. यामध्ये एक स्वदेशी आणि सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे. हे उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV-C56 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे. 

सिंगापूरने पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी इस्रोची मदत घेतली. त्यासाठी इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटद्वारे सिंगापूरच्या DS-SAR आणि इतर 6 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. रविवार सकाळी  6.30 वाजता या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. चांद्रयान -3 चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर इस्रोची ही आणखी एक यशस्वी कामगिरी आहे. 

वर्षातली तिसरी व्यावसायिक मोहिम

भारतीय अंतराळ संस्थेची या वर्षातील ही तिसरी व्यावसायिक मोहीम आहे. इस्रोने यापूर्वी मार्चमध्ये LVM-3 रॉकेटसह ब्रिटनच्या वन-वेव्ह (ONE-WAVE) शी संबंधित 36 उपग्रह प्रक्षेपित केले होते. यानंतर एप्रिलमध्ये पीएसएलव्ही रॉकेटमधून सिंगापूरचे 2 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले. DS-SAR हे उपग्रह सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान, तंत्रज्ञान एजन्सी आणि ST अभियांत्रिकी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी विकसित करण्यात आले आहे. 

या उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर हा उपग्रह आता सिंगापूरच्या विविध संस्थांच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. DS-SAR ही उपग्रह इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजकडून विकसित करण्यात आले आहे. यामध्ये सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे या उपग्रहाला दिवसा आणि रात्री हवामानातील सर्व बदलांचे छायाचित्रे घेता येणार आहेत. 

ISRO च्या विश्वसनीय रॉकेट PSLV चे हे 58 वे उड्डाण होते. तसेच  ‘कोअर अलो कॉन्फिगरेशन’ असलेले इस्रोच्या पीएसएलव्हीचे 17 वे उड्डाण होते. पीएसएलव्ही रॉकेटला इस्रोचा वर्कहॉर्स म्हणतात. या रॉकेटच्या माध्यमातून उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करता येते. 

चांद्रयान – 3 चे यशस्वी प्रक्षेपण 

भारताचे चांद्रयान-3 हे यान शुक्रवार (14 जुलै) रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान-3 अवकाशात झेपावले आणि देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. मोहिमेसाठी भारताने तब्बल 615  कोटी रुपये खर्च केलेत. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. 

हे ही वाचा : 

Chandrayan-3 : इस्त्रोच्या मोहिमेत महाराष्ट्राचा मोठा वाटा; चांद्रयान-3 चं पुणे कनेक्शन आहे माहिती आहे का?

[ad_2]

Related posts